Friday, May 3, 2024
Homeनाशिकआयमातर्फे करोना लसीकरण व चाचणी केंद्र

आयमातर्फे करोना लसीकरण व चाचणी केंद्र

सातपूर । प्रतिनिधी

आयमाने एमआयडीसी व नाशिक महानगरपालिका यांचे सयुंक्त विद्यमाने अंबड, सातपूर तसेच सिन्नर येथे व्हॅक्सिनेशन, रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट याचे केंद्र सुरु करण्याचे नक्की केले आहे. या उपक्रमातील पहिले केंद्र आयमा रिक्रिएशन सेंटर येथे सोमवार पासून सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

तसेच आयमातर्फे रॅपिड अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर टेस्ट केंद्र सोमवारपासून एमआयडीसीच्या आयटी पार्क येथे सुरु होणार आहे याचे ऑनलाइन उदघाटन आज (दि.19) नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते सकाळी 11.30 वाजता होणार असल्याचे आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष निखिल पांचाळ यांनी सांगितले.

सर्व उद्योजकांनी आपल्याकडील 45 वर्षावरील कामगार व स्टाफ व स्वतः जे व्हक्सीनेशनसाठी पात्र आहेत अशा सर्वानी आधारकार्ड ची सत्यप्रत व स्वत:चे नाव, कम्पनीचे नाव आयमा इमेलवर aimnsk.aimagmail.com .लेा सोमवारी नोंदणी करावयाची आहे. त्यानुसार एक दिवस आधी ऑनलाइन नोंदणी केल्यास ती मागणी मनपा कडे नोंदवली जाईल. मागणी नंतरच व्हॅक्सीनेशन मिळणार आहे. यासाठी एक दिवस आधी नाव नोंदणी करावयाचे आहे . नियोजनानुसार आयमात दररोज 200 व्हॅक्सीनेशन देण्यात येणार आहे.

शासनाने निश्चित केल्याप्रमाणेव्हॅक्सीनेशनसाठी (रु .250/), अँटीजेन टेस्टींगसाठी (रु. 150/-) आरटीपीसीर टेस्टींगसाठी( रु. 550/) दर आकारणी केली जाणार असल्याचे आयमाचे अध्यक्ष वरूण तलवार, सरचिटणीस ललित बुब, उपाध्यक्ष निखिल पांचाळ, राजेंद्र अहिरे, सुदर्शन डोंगरे, धनंजय बेेळे, उन्मेष कुलकर्णी, राजेंद्र पानसरे, योगिता आहेर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या