Friday, May 3, 2024
Homeनाशिकदिवसभरात २१ हजार जणांचे झाले लसीकरण

दिवसभरात २१ हजार जणांचे झाले लसीकरण

नाशिक। प्रतिनिधी

नाशिक शहरासह जिल्हाभरात कोरोना प्रतिबंधक लसीच्या तुटवडड्याचा सामना केल्यानंतर अखेर बुधवारी जिल्ह्याला 32 हजार लसी उपलब्ध झाल्या आहेत. यातील 21 हजार जणांचे आज दिवसभरात लसीकरण पुर्ण झाले आहे. पुढील लसीकरणासाठी पुन्हा प्रतिक्षेची वेळ आली आहे…

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर तसेच 18 ते 44 वयोगटालाही लस सुरू केल्याने लसींची मागणी वाढली आहे. शहर तसेच जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण सुरू असून आतापर्यंत जिल्ह्यात 7 लाख 60 हजार 748 लसींचे दोन्ही मिळून डोस देण्यात आले आहेत. जिल्ह्यात लसींचा अपुरा साठा असल्याने पुन्हा एकदा लसीकरणावर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान काल उपलब्ध झालेल्या साठ्यामुळे गुरूवारी दिवसभरात दोन्ही मिळून 21 हजार 310 जणांना लस देण्यात आली आहे.

करोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता 16 जानेवारी 2021 पासून संपुर्ण देशासह जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र गेली दोन दिवस लसींचा तुटवडा असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद होती. बुधवारी 32 हजार लसींचा पुरवठा झाल्याने नाशिक महापालिकेच्या 21 तर जिल्हाभरातील 109 अशा एकुण 130 केंद्रांवर लसीकरण सुरू होते.

दरम्यान आतापर्यंत आरोग्य कर्मचारी, शासकीय कर्मचारी अशा 1 लाख 25 हजार 44 जणांना पहिला तर 53 हजार 674 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांमपैकी आतापर्यंत 2 लाख 31 हजार 952 जणांना पहिला तर 51 हजार 435 जणांन दुसरा डोस देण्यात आला आहे. 45 वर्षांपुढील 2 लाख 57 हजार 199 जणंना पहिला तर 36 हजार 208 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

आज दिवसभरात जिल्ह्यात 10 हजार 331 जणांना पहिला डोस देण्यात आला. यामध्ये नाशिक पालिका हद्दीत 2 हजार 293, ग्रामिण जिल्ह्यात 7 हजार 352, मालेगाव 686 असे लसीकरण झाले आहे. तर 10 हजार 979 जणांना दुसरा डोस देण्यात आला.

18 वर्षावरील सर्व वयोगटांतील नागरीकांचे लसीकरण करण्यात सुरू करण्यात आले आहे. यामध्ये आज दिवसभरात जिल्ह्यात पिंपळगाव, मोहाडी, इंदिरागांधी, मालेगाव नीमा, नाशिकरोड युपीएसी या पाच केंद्रांवर 1 हजार 652 जणांना लस देण्यात आली. आतापर्यंत या गटातील 5 हजार 223 जणांना लस देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या