Thursday, May 2, 2024
HomeनाशिकExclusive Interview : लस घ्या पण नियम पाळून

Exclusive Interview : लस घ्या पण नियम पाळून

१ मे पासून लसीकरण सुरु झाले आहे. यापार्श्वभूमीवर नाशिकमध्ये नियोजन झाले असून बुकींचे स्लॉटदेखील यायला लागले आहेत. दरम्यान, या पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी साधलेला संवाद.

१ – आजपासून १८ ते ४५ वयोगटातील लोकांना लसीकरण सुरु झाले आहे याबाबत आपण जनतेला काय संदेश द्याल ?

- Advertisement -

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आजपासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम आज सुरू करण्यात आलेली आहे. लसीकरण मोहीम जरी सुरू करण्यात आली असली तरी लसींच्या उपलब्धतेनुसार ती प्राप्त होणार आहे. त्यामुळे आज पासून प्रयोगिक तत्वावर लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. नागरिकांनी एकदम गर्दी न करता टप्याटप्याने जशा लसी उपलब्ध होतील त्याप्रमाणात लसीकरण करून घ्यावे.

२ – लस का घ्यावी ?

करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून लसीकरण केलेल्या नागरिकांना प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण अगदी नगण्य असून लसीकरण कोरोनासाठी अतिशय फायदेशीर आहे. अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात आल्याने कोरोना आटोक्यात आल्याची उदाहरणे आपल्या समोर आहे. त्यामुळे या संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी लसीकरण अतिशय महत्वपूर्ण असून नागरिकांनी लस घेणे आवश्यक आहे.

३. या लसीकरनासाठी काय नियोजन करण्यात आले आहे.

लसीकरणाच्या दृष्टीने शासनाने योग्य ते नियोजन केले आहे. या अगोदर ४५ वर्षांहून पुढच्या नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले केंद्र आणि १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांसाठी तयार करण्यात आलेले केंद्र हे स्वतंत्र असणार आहे. नाशिक जिल्ह्यात आज प्रयोगिक स्वरूपात पाच केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्या माध्यमातून लसीकरण करण्यात येत आहे. ज्या प्रमाणात लस उपलब्ध होईल त्या प्रमाणात लसीकरण अधिक जलदरित्या राबविण्यात येईल. त्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या