Friday, May 3, 2024
Homeराजकीय'रेमडिसीविरचा 'गेम' डिसीविर करू नका'

‘रेमडिसीविरचा ‘गेम’ डिसीविर करू नका’

मुंबई | Mumbai

करोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरूच असून, जवळपास सर्वच राज्यांमध्ये करोनानं हातपाय पसरले आहेत. सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी तसेच रेमडेसिवीरवरसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडाली आहे.

- Advertisement -

त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शन आणि इतर वैद्यकीय पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री अध्यक्ष रामदास आठवलेंनी उडी घेतली आहे. रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत महाविकास आघाडी सरकार टीका केली आहे. रेमडेसिवीरचा ‘गेम’डेसिवीर करू नका असे आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवले यांनी म्हंटल आहे की, ‘रेमडेसीविरसह सर्व औषधे महाराष्ट्राला मिळतील. औषधे पुरवू नका असे कोणतेही सरकार आदेश देऊ शकत नाही.राज्य सरकार केंद्रावर खोडसाळ आरोप करीत आहे. केंद्राकडे बोट दाखवुन आपले अपयश लपवू शकत नाही.कोरोनाचा कहर रोखण्याची जबाबदारी राज्य सरकारचीसुद्धा आहे.त्यामुळे आरोपांचे राजकारण कोणी करू नये’, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

तसेच, ‘रेमडिसीविरचा गेम डिसीविर करू नका, कोरोनाच्या संकटकाळात महाविकास आघाडीच्या नेत्यांनो आरोपांचे राजकारण करू नका’ असा टोला त्यांनी लगावला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या