Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशCornavirus : देशात ३.११ नव्या रुग्णांची नोंद, तर ३.६२ लाखांहून अधिक करोनामुक्त

Cornavirus : देशात ३.११ नव्या रुग्णांची नोंद, तर ३.६२ लाखांहून अधिक करोनामुक्त

दिल्ली | Delhi

करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.

- Advertisement -

दैनंदिन करोना रुग्णांची संख्या एकीकडे कमी होत असताना मृत्यूंच प्रमाण अद्याप चार हजारांच्या पुढेच असल्याचे चित्र आहे. गेल्या २४ तासांतील मृतांची आकडेवारीही चिंताजनक आहे. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांपेक्षा करोनावर मात करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ११ हजार १७० नवे करोना रुग्ण आढळले असून ४ हजार ०७७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ४६ लाख ८४ हजार ०७७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ७० हजार २८४ वर पोहोचली आहे.

तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ६२ हजार ४३७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ०७ लाख ९५ हजार ३३५ वर पोहचली आहे.

महाराष्ट्रात करोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरीही मृत्यूनं चिंता वाढवली आहे. शनिवारी एकट्या महाराष्ट्रात ९०० पेक्षा जास्त करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रानंतर कर्नाटक, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशसारख्या राज्यानं चिंता वाढवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या