Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशदेशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

देशात ‘इतके’ नवे करोना रुग्ण

नवी दिल्ली –

- Advertisement -

देशात गेल्या 24 तासांत 11 हजार 666 नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 123 जणांच्या मृत्यू झाला आहे. तसेच काल दिवसभरात

14 हजार 301 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 कोटी 7 लाख 1 हजार 193 झाला आहे. यापैकी 1 लाख 53 हजार 847 जणांचा मृत्यू झाला असून 1 कोटी 3 लाख 73 हजार 606 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच सध्या 1 लाख 73 हजार 640 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, देशातील करोना संसर्ग अद्याप पूर्णपणे थांबलेला जरी नसला, तरी त्याचा वेग मात्र नक्कीच कमी झाल्याचे दिसून येत आहे. दिलासादायक बाब म्हणजे करोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही दररोज मोठी भर पडत आहे.

बहुतांश ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये नवे करोनाबाधित रुग्ण देखील आढळले नसल्याचे समोर आले आहे. तसेच, देशभरात मागील 24 तासांमध्ये 14 हजार 301 जणांनी करोनावर मात केल्याचे समोर आले आहे. तर, आतापर्यंत देशात 1 कोटी 3 लाख 73 हजार 606 जणांना डिस्चार्ज मिळालेला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी माहिती दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या