Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रमुंबईत 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबईत 24 तासांत ‘इतके’ नवे करोना रुग्ण

मुंबई –

मुंबईतील एकूण करोना बाधितांची संख्या दोन लाखांनजीक पोहोचली आहे. मुंबईत 24 तासांत 2,282 करोनाबाधितांची नोंद झाली असून

- Advertisement -

44 रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईतील रुग्णवाढीचा वेग गेल्या आठवडयात काहीसा कमी झाला. मात्र वांद्रे पश्चिम, बोरिवली, अंधेरी पश्चिम, दहिसर, कांदिवली, गोरेगाव या भागांत वेगाने रुग्णवाढ होत आहे.

शनिवारी मुंबईतील 1942 रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत 1 लाख 58 हजार 749 म्हणजेच 81 टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत 28,568 रुग्ण उपचाराधीन आहेत. एका दिवसात बाधितांच्या संपर्कातील 15 हजार लोक शोधण्यात आले आहेत. त्यापैकी 2082 जणांना पालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या