Friday, May 3, 2024
HomeनगरCOVID19 : दुसर्‍या दिवशीही दिलासा.. बाधितांपेक्षा रिकव्हर रुग्ण वाढले

COVID19 : दुसर्‍या दिवशीही दिलासा.. बाधितांपेक्षा रिकव्हर रुग्ण वाढले

अहमदनगर | प्रतिनिधी

दोन दिवसांपासून जिल्ह्यात करोनाची स्थिती दिलासादायक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नव्याने बाधित येणार्‍या रुग्णांपेक्षा उपचार घेऊन करोनावर मात केलेल्यांची संख्या अधिक आहे. यामुळे करोना संसर्गाच्या साखळीला काही प्रमाणात बे्रक लागल्याचे चित्र आहे. असे असले तरी धोका अद्याप संपलेला नसून नगरकरांनी दक्षता घेण्याची सुचना वैद्यकीय वर्तुळातून देण्यात येत आहे.

- Advertisement -

सोमवारी जिल्ह्यात 3 हजार 195 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे करोनावर मात केलेल्यांची संख्या 1 लाख 37 हजार 686 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 84.80 टक्के झाले आहे. काल जिल्ह्यात नव्याने 2 हजार 866 करोना रुग्ण वाढले असून यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 22 हजार 840 इतकी झाली आहे. तर काल करोनामुळे 34 लोकांचे प्राण गेलेले आहेत.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 608, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 642 आणि अँटीजेन चाचणीत 616 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 188, अकोले 241, जामखेड 91, कर्जत 105, कोपरगाव 30, नगर ग्रामीण 73, नेवासा 40, पारनेर 92, पाथर्डी 97, राहाता 38, राहुरी 28, संगमनेर 224, शेवगाव 218, श्रीगोंदा 26, श्रीरामपूर 51, कँटोन्मेंट बोर्ड 49, मिलिटरी हॉस्पिटल 12 आणि इतर जिल्हा 05 अशा रुग्णांचा समावेश आहे. खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 232, अकोले 22, कर्जत 6, कोपरगाव 8, नगर ग्रामीण 33, नेवासा 10, पारनेर 5, पाथर्डी 3, राहाता 81, राहुरी 8, संगमनेर 162, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 25, कँटोन्मेंट बोर्ड 23 आणि इतर जिल्हा 15 आणि इतर राज्य 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 616 जण बाधित आढळून आले. मनपा 49, अकोले 14, जामखेड 9, कर्जत 72, कोपरगाव 34, नगर ग्रामीण 51, नेवासा 74, पारनेर 29, पाथर्डी 26, राहाता 40, राहुरी 84, संगमनेर 6, शेवगाव 16 श्रीगोंदा 81, श्रीरामपूर 25 आणि इतर जिल्हा 6 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, काल डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 726, अकोले 199, जामखेड 45, कर्जत 212, कोपरगाव 182, नगर ग्रामीण 255, नेवासा 110, पारनेर 134, पाथर्डी 89, राहाता 204, राहुरी 103, संगमनेर 295, शेवगाव 211, श्रीगोंदा 120, श्रीरामपूर 112, कॅन्टोन्मेंट 126, मिलिटरी हॉस्पिटल 23 आणि इतर जिल्हा 49 अशा रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत करोनामुळे 1 हजार 849 मृत्यू झाले असून यात कालच्या 34 मृतांचा समावेश आहे.

असे आहेत रुग्ण

नगर मनपा 469, संगमनेर 392, अकोले 277, शेवगाव 234, कर्जत 183, राहाता 159, नगर ग्रामीण 157, पारनेर 126, पाथर्डी 126, नेवासा 124, राहुरी 120, श्रीगोेंदा 115, श्रीरामपुर 101, जामखेड 100, भिंगार 72, कोपरगाव 72, अन्य जिल्हा 26, लष्कार रुग्णालय 12 अन्य राज्य 1 असे आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या