Sunday, May 5, 2024
Homeदेश विदेशCoronavirus : भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक

Coronavirus : भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक

दिल्ली | Delhi

करोना महामारीने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. देशात करोनाची दुसरी लाट आता भयंकर होत चालली आहे. देशात करोनामुळे प्राण गमावलेल्यांचा आकडा दिवसागणिक वाढताना दिसत आहे.

- Advertisement -

दररोज तीन लाखांहून अधिक नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. यामुळे देशात सक्रीय रुग्णांचा आकडादेखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु, यामध्ये दिलासा देणारी बातमी म्हणजे सक्रीय रुग्णांसोबत करोनापासून मुक्त होणार्‍यांचे प्रमाणदेखील वाढतच आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात देशात तब्बल ३ लाख ५२ हजार ९९१ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील एकूण रुग्ण संख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे.

देशात सक्रिय रुग्नांची संख्या २८ लाख १३ हजार ६५८ इतकी झाली असून मृतांची संख्या १ लाख ९५ हजार १२३ इतकी झाली आहे. तसेच देशात आतापर्यंत १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

ICMR दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत एकूण २७ कोटी ९३ लाख २१ हजार १७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. यातील १४ लाख ०२ हजार ३६७ नमुन्यांची करोना चाचणी रविवारी करण्यात आली.

‘या’ राज्यांमध्ये परिस्थिती बिकट

करोनाग्रस्तांची संख्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये वाढत आहे. पण दिल्ली, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्ये या यादीत आघाडीवर आहेत. महाराष्ट्रात रुग्णसंख्या वाढत असल्याने बेड्स अपुरे पडत चालले आहेत. दिल्लीतील अनेक हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे. तर काहींना बेड मिळत नाहीत. हीच अवस्था उत्तर प्रदेशच्या लखनऊ, वाराणसी, कानपूरसहित अन्य शहरांची झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या