Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशभारतात तयार होणार करोनाची लस

भारतात तयार होणार करोनाची लस

सार्वमत

पुणे (प्रतिनिधी) – करोना लसीसंदर्भात पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटने इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधनात्मक काम सुरू केले असून, लवकरच ही लस भारतात तयार होणार आहे. मे पर्यंत या लसीचे उत्पादन सुरू करणार असून, सप्टेंबरपर्यंत 4 कोटीA लस तयार करणार असल्याची माहिती सिरम इन्स्टिटयूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी दिली.

- Advertisement -

कोरोनाने अवघ्या जगाला विळखा घातला असून, या विषाणूने आत्तापर्यंत 2 लाखांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. भारतापुढेही करोनाने आव्हान उभे केले असून, ही आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जगभर करोनावरील लसीचे संशोधन सुरू असून, विविध देशांमध्ये यासंदर्भातील कामाने वेग घेतला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या हयुमन ट्रायलमध्ये पुण्यातील सिरम इन्स्टिटयूटदेखील सहभागी झाली आहे.प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूट मे-जूनमध्ये करोनावरील उपचारासाठी एका लसीचे क्लिनिकल ट्रायल आणि उत्पादन एकाचवेळी सुरु करण्याची शक्यता आहे. कंपनी या लसीचे उत्पादन पुण्यातील प्रकल्पामध्ये करण्याची शक्यता आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार देशातील सध्याची परिस्थिती पाहता कोणतीही ट्रायल न घेता लसीचे उत्पादन करण्याची जोखीम घेतली जात आहे. जर ट्रायल यशस्वी झाली तर सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.

या कंपनीला थकज ची मान्यता असून क्लिनिकल ट्रायलनंतर 2 ते 4 कोटी डोस तयार केले जाणार आहेत. ही कंपनी जगातील सर्वात मोठी औषधे निर्माण करणारी कंपनी आहे. सीरम इंस्टिट्यूट वर्षाला जवळपास 1.5 अब्ज लसींचे उत्पादन करते. तर जगातील 170 देशांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो. कंपनी अनेक जीव वाचविणारी लस बनविते. यामध्ये पोलिओ, फ्ल्यू, डीटीपी, आर हिपेटायटीस बी, रुबेला, मम्प्स, टिटनसचेचक अशा आजारांवरील औषधांचा समावेश आहे.
यासंदर्भात बोलताना पूनावाला म्हणाले, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीशी आमचा याबाबत करार झाला आहे. यूएस कंपनी, पुण्यातील तसेच अन्य वेगळयावेगळया कंपन्या अशा चौघांचा यात समावेश आहे. मागे इबोलावरही अशीच लस तयार करण्यात आली होती.

करोना लसीबाबत सध्या लंडनमध्ये माणसांवर याचे टेस्टिंग सुरू आहे. मात्र, त्याचे रिझल्ट येण्याकरिता सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागणार आहे. परंतु, तोपर्यंत न थांबता रिस्क घेऊन आम्ही मे-जूनमध्येच लस तयार करणार आहोत. आत्ताच या स्तरावर काम केले नाही, तर आपल्याला सहा महिने थांबावे लागेल. म्हणूनच ही जोखीम स्वीकारणे महत्त्वपूर्ण ठरते. त्यासाठी ही लस बनवून ठेवण्यात येईल व लस यशस्वी झाल्याचा रिझल्ट आल्यानंतर ती बाजारात आणली जाईल.
कोरोना लसीकरिता 600 कोटी लस तयार करणाऱया प्लँटची आवश्यकता आहे. त्यामुळे आमचा सध्याच्या याच क्षमतेच्या प्लँटमधील विविध लसींचे उत्पादन बंद करून त्याचे रूपांतर सध्या कोविडकरिता करण्यात येणार आहे. यामुळे कंपनीला मोठे नुकसान होणार आहे. परंतु, दुसरा प्लँट उभा राहीपर्यंत हे करणे देशाची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

एक हजार रुपयांपर्यंत लस उपलब्ध होणार
सप्टेंबरपर्यंत साधारणपणे 4 कोटी लस तयार केल्या जातील, असे सांगून ते म्हणाल्या, यासाठी तसा मोठा खर्च आहे. त्यामुळे त्याची 9 ते 10 हजारांपर्यंतही विक्री करता येऊ शकते. मात्र, आपल्या वडिलांनी सामाजिक भान व सेवाभाव ठेऊन वैद्यकीय सेवा देण्याची सदैव शिकवण दिली आहे. त्यामुळे एक हजार रुपयांपर्यंत ही लस उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या