Thursday, May 2, 2024
Homeनाशिकउड्डाणपूलासाठी मनपा करणार झाडांचे पुनर्रोपण

उड्डाणपूलासाठी मनपा करणार झाडांचे पुनर्रोपण

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

नवीन नाशिक (Navin Nashik) भागात होणार्‍या दोन्ही उड्डाणपुलाच्या (flyover work) कामात येणार्‍या अडचणी दूर करण्यात येतील. जास्त हानी होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच याबाबत सखोल अभ्यास करून विकास कामे होणार आहेत, असा दावा महापालिका आयुक्त कैलास जाधव (Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी केला आहे.

- Advertisement -

दरम्यान, कमीत कमी झाड तोडण्यात (Tree felling) येईल, कामात येणार्‍या झाडांची संख्या (trees) तसेच त्याचे इतर ठिकाणी पुनर्रोपण करण्यात येणार आहे. ज्या झाडांचे पुनर्रोपण (Replanting of trees) करण्यात येऊ शकत नाही. त्या संख्येने नवीन झाडे लावण्यात येणार आहे. भविष्यात निओ मेट्रोचा (Neo Metro) मार्ग देखील येथून जाणार आहे. पुढे या भागात पुन्हा सर्वे करावा लागणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

नवीन नाशिक भागातील त्रिमूर्ती चौकापासूनच्या उड्डाणपूल (flyover) कामात 100 पेक्षा कमी झाडे येत आहेत, तर मायको सर्कल येथील उड्डाणपूलमध्ये अधिक झाडे जात आहेत. दरम्यान, दोनशे वर्षे जुने झाड तोडण्यात येणार नाही, मात्र इतर झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. तसेच ज्यांचे पुनर्रोपन शक्य नाही, त्या नवीन जागी झाडें लावली जाणार आहेत.

पुलासाठी आम्हाला अधिक काळजीपूर्वक अभ्यास करावा लागणार आहे, कारण याच मार्गातून नियो मेट्रोचा देखील मार्ग जाणार आहे. दरम्यान, वृक्ष प्राधिकरण समितीवर वृक्षतोडीचा प्रस्ताव आलेलाच नाही. फक्त कामाच्या बाबतीत सर्वे करण्यात आला होता. त्याच्यात 588 झाडे असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र त्यात दोनशे वर्षे जुने झाड तोडण्याचे काहीच म्हटलेले नव्हते, असे त्यांनी सांगितले.

नवीन आदेश

रस्त्याचे किंवा उड्डाणपुलाचे कामासंदर्भात नव्याने आदेश करण्यात येणार आहे. कामाचे टेंडर करण्यापूर्वी सर्व प्रकारची माहिती तसेच विशेष करून झाडांची माहिती गोळा करण्याचे सांगण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नव्या कामामुळे होणारी हानी, ऐतिहासिक स्थळांची माहिती गोळा करण्यात येऊन त्यावर अभ्यास करून मग टेंडर करून कामे करण्यात येतील, असे प्रशासनाने ठरविले असल्याचे समजते.

- Advertisment -

ताज्या बातम्या