Monday, May 6, 2024
Homeधुळेमहापालिकेतील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी होणार

महापालिकेतील भ्रष्टाचारांची सखोल चौकशी होणार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार आ. फारूख शाह यांनी केली होती. त्या तक्रारीची दखल घेवून चौकशीचे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

- Advertisement -

एकाच ठिकाणी दोन कामे दाखवून शासनाच्या पैशांचा दुरूपयोग झाला आहे. तसेच शहराची लोकसंख्या अंदाजे 4 लाख असली तरी लॉकडाऊनच्या काळात देखील महापालिका क्षेत्रात अधिकार्‍यांच्या संगनमताने 200 टन कचरा जमा झाला.

कचरा संकलनात अर्ध्यागाड्या लावून पूर्ण गाड्यांचे बिले काढण्याचे काम महापालिकेत झाले आहे. कचर्‍याचे वजन वाढावे म्हणून रेती, माती, दगड-गोटे भरून भ्रष्टाचार अधिकार्‍यांनी केला आहे. अशी तक्रार आ. शाह यांनी केली आहे.

आज सुद्धा शहरात कचर्‍याचे मोठे ढिग दिसून येत आहे. महापालिकेतील पाणीपुरवठा विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार असून आज सुद्धा नागरिकांना अस्वच्छ व पिवळसर पाणी प्यावे लागत आहे.

कोविड काळात कंटेनमेंट झोनसाठी रस्त्यांवर बांबू लावून बंधिस्त करण्यामध्ये सुद्धा अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार केला. बाहेरून आलेल्या प्रवाशांच्या सोयी सुविधांसाठी दिलेल्या निधीचा सुद्धा दुरुपयोग केला गेला आहे.

मनपा अधिकार्‍यांनी कोवीड 19 च्या काळातील शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून मागील वर्षात अनेक ठेकेदारांची प्रलंबित देयके (बिले) टक्केवारी घेऊन अदा केलेली आहे. यासंबंधी वारंवार सुचना व लेखी पत्र दिले.

महापालिकेच्या काही अधिकारी व काही पदाधिकार्‍यांनी याबाबत कुठलीही दखल घेतलेली नाही. मनपात होणार्‍या भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची एक विशेष समिती नेमून खातेनिहाय चौकशी व्हावी यासाठी आ.फारूक शाह यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून अपहाराची तक्रार केली. ना. एकनाथ शिंदे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या