Friday, April 25, 2025
Homeजळगावरावेर येथे होणार १४ टेबलवर २३ फेऱ्यांमधून मतमोजणी

रावेर येथे होणार १४ टेबलवर २३ फेऱ्यांमधून मतमोजणी

रावेर | प्रतिनिधी raver
रावेर मतदार संघात निकालाची मोठी उत्सुकता लागली आहे. प्रशासनाने देखील मतमोजणी करण्यासाठी तयारी पूर्ण केली असून १४ टेबलवर २३ फेऱ्यामधून मतमोजणी केली जाणार आहे. तर टपाली मतदानाची ७ टेबलवर मोजणी केली जाणार आहे.

दि.२० रोजी झालेल्या मतदानात १४९० कर्मचारी व ४५० पोलिस कर्मचारी ६५ निरिक्षक यांच्या सहकार्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर रात्री उशिरापर्यंत मतपेट्या जमा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचे रीघ सुरू होती.३३ टेबलावर मतदान पेटी व साहित्य जमा करण्यात आले.

- Advertisement -

निवडणुकीत २ लाख २७ हजार ६७२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.मतमोजणी दि.२३ रोजी सकाळी ८ वाजता रावेर प्रशासकीय इमारतीत सुरू होणार आहे.दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती शक्यता आहे. यासाठी संपूर्ण प्रशासन व कर्मचारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी बबनराव काकडे यांचे मार्गदर्शनाखाली कामकाज करीत असून त्यासाठी तहसीलदार रावेर बी.ए. कापसे,तहसीलदार यावल मोहनमाला नाझीरकर निवडणूक नायब तहसीलदार किशोर पवार,आर. डी पाटील,निवासी नायब तहसीलदार संजय तायडे काम करत आहेत. तसेच मंडळ अधिकारी विठोबा पाटील हे सर्व तांत्रिक कामकाज सांभाळत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...