Thursday, May 2, 2024
Homeनगरराहुरीत हॉटेल ऐश्वर्यामधील वेश्याव्यवसायावर धाडसी कारवाई

राहुरीत हॉटेल ऐश्वर्यामधील वेश्याव्यवसायावर धाडसी कारवाई

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा पाठोपाठ काल राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या येथे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर

- Advertisement -

राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेलचालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणार्‍या महिलेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे तालुक्यात अवैध धंदे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

राहुरीतील बसस्थानकासमोरील हॉटेल ऐश्वर्या येथे गेल्या अनेक महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू होता. याबाबत पोलीस प्रशासनाला खबर मिळताच श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके व राहुरीचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार वाघ, हवालदार लक्ष्मण बोडखे, पोलीस नाईक संजय जाधव, पी. सी. थोरात व महिला पोलीस कर्मचारी राधिका कोहकडे यांनी राहुरी बसस्थानकासमोर असलेल्या हॉटेल ऐश्वर्या येथे छापा टाकून धाडसी कारवाई केली. यावेळी दोन पुरूषांना आणि हॉटेलचालकाला ताब्यात घेतले. तर वेश्या व्यवसाय करणार्‍या तीन महिलांची सुटका केली. याच

दरम्यान राहुरी येथील एक कॉलेज तरूणी राहुरी फॅक्टरी येथून राहुरीकडे येत असताना ती एका रिक्षामध्ये बसली. यावेळी रिक्षाचालक व एक महिला रिक्षामध्ये बसलेले होते. रिक्षामध्ये असलेल्या महिलेने त्या कॉलेज तरूणीचा गळा दाबून गप्प केले. रिक्षा राहुरी कॉलेजजवळ आली. यावेळी त्या तरूणीने चालत्या रिक्षामधून उडी मारली. आणि मदतीसाठी आरडाओरडा केला.

यावेळी विकी शिंदे, संकेत तनपुरे, सुजीत पटारे, आकाश गुलदगड, सुनील लावरे या कॉलेज तरूणांनी त्या तरूणीला धीर दिला. यावेळी त्या तरूणीने घडलेली घटना त्या तरूणांना सांगितली. घटनेचे गांभीर्य ओळखून त्या कॉलेज तरूणांनी त्या तरूणीची सुटका करून तिला ताबडतोब राहुरी पोलीस ठाण्यात आणले. याबाबत राहुरी पोलिसांत सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या