Friday, May 3, 2024
Homeनगर‘अंडर शटर’वर प्रशासनाची वक्रदृष्टी

‘अंडर शटर’वर प्रशासनाची वक्रदृष्टी

अहमदनगर | Ahmednagar

नगर शहरातील व्यापारी करोना प्रतिबंधाचे नियम (Covid-19 protocols) शिथील होण्याच्या प्रतिक्षेत असताना प्रशासनाने निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर शहरात सायंकाळी 4 नंतर ‘अंडर शटर’ सुरू असलेल्या दुकानांवर कारवाईची सुचना जिल्हाधिकार्‍यांनी (Collector Dr. Rajendra Bhosale) दिली आहे.

- Advertisement -

नगर शहरात कोविड रूग्णांची (Covid patients) संख्या कमी असल्याने बाजाराची वेळ वाढवून द्यावी आणि शनिवार, रविवारचा लॉकडाऊन (weekend lockdown) मागे घ्यावा, अशी मागणी आहे. मात्र संसर्ग वाढीच्या वेगाचा दाखला देवून आता प्रशासन अधिक कडक भुमिका घेण्याच्या तयारीत आहे.

शहरातील व्यापार्‍यांनी करोना निर्बंध किमान शहरासाठी शिथील करावेत अशी मागणी लावून धरली आहे. काल 11 जिल्हे वगळता राज्यातील अन्य भागात निर्बंध शिथील करण्यात आले. बाजारपेठेला रात्री 8 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली. मात्र 11 जिल्ह्यात नगरचा समावेश असल्याने निर्बंध कायम आहेत. जिल्ह्याधिकार्‍यांनी सुसंगत वर्तणुकीचे पालन होत नसल्याने जिल्ह्याच्या काही तालुक्यात करोना रुग्ण संख्या पुन्हा गतीने वाढताना दिसत असल्याचे म्हटले आहे.

हा दर वाढत राहिल्यास जिल्ह्यात पुन्हा अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद करावे लागतील. काही ठिकाणी परवानगी दिलेल्या व्यतिरिक्त आस्थापना सुरु असल्याचे दिसत आहे. अशा आस्थापना बंदची कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. महानगरपालिका क्षेत्रातही सायंकाळीही आस्थापना सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. संबंधित यंत्रणांनी प्रतिबंधात्मक कारवाई गतिमान करावी, अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या.

आम्हाला का शिक्षा?

नगर (Ahmednagar) शहरात करोना रूग्णांची संख्या कमी असल्याकडे व्यापारी संघटना लक्ष वेधत आहेत. गेल्या दीड वर्षापासून बाजारात निर्बंध असल्याने व्यापार कोसळला आहे. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. बाजारावर हे निर्बंध वाढत राहिल्यास आर्थिक अडचणींत भर पडणार आहे. त्यामुळे ज्याठिकाणी करोना रूग्णांची संख्या कमी आहे, अशा ठिकाणी बाजारपेठेची वेळ वाढवून मिळावी, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी लोकप्रतीनिधी आणि मंत्र्यांशीही चर्चा केली. मात्र आश्वासनापलिकडे हाती काही लागले नाही. नगर शहराची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी बाजाराची वेळ वाढविणे गरजेचे आहे, असा सूर व्यापारी वर्गातून आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या