Thursday, May 2, 2024
Homeनाशिकसावतानगर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार

सावतानगर येथील कोविड सेंटर लवकरच सुरू होणार

नविन नाशिक । प्रतिनिधी

नवीन नाशकात करोनाचे रुग्ण वाढत असतांना उपचारासाठी कोविड सेंटर नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. मनपा कडुन नवीन नाशकातील प्रभाग क्रमांक 25 मधील सावतानगर येथील क्रॉम्टन हॉल ( सावरकर हॉल ) येथे 60 ऑक्सीजन बेड व रायगड चौक मनपा शाळेत 100 बेड असे 160 बेडचे कोविड सेंटर उभारण्याचे काम अंतीम टप्यात आहे.

- Advertisement -

येत्या काही दिवसांतच या कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती प्रभागाचे नगरसेवक शिवसेना महानगर प्रमुख, स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर यांनी दिली.

शहरातील सर्वाधिक करोना रुग्ण नवीन नाशिक परिसरातआहे. त्यामुळे हा परिसर करोना हॉट स्पॉट झाला आहे. मनपाचे शहरातील सर्व विभागात करोना रुग्णांसाठी कोवीड सेंटर आहे. परंतु नवीन नाशकात करोना रुग्ण असुनही कोविड सेंटर नव्हते, त्यामुळे परिसरातील सर्व सामान्य असलेले करोना रुग्णांना उपचारासाठी नाशकातील मनपाचे झाकीर हुसेन, नाशिकरोड भागातील बिटको हॉस्पिटल येथे जावे लागत होते. कित्येकदा तेथील रुग्णालयात बेड शिल्लक नसल्याने नवीन नाशकातील रुग्णांना परत पाठविले जात होते.

सावतानगर भागात कोविड सेंटर उभारावे व या सेंटरमध्ये ऑक्सीजन बेड,व्हेंटीलेटर बेड, आयसीयु विभाग या सह सुविधा उपलब्ध करुन दयावे या मागणीचे निवेदन नागरिकांनी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांना दिले. नगरसेवक बडगुजर यांनी मनपा प्रशासन व मनपा आयुकत यांची भेट घेऊन चर्चा केली व निवेदन दिले. मनपा आयुकत यांनी या कोविड सेंटर ला मान्यता दिली. या नंतर मनपाचे अधिकारी, मनपा नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांनी सावतानगर येथील सावरकर हॉल व रायगड चौक येथील मनपा शाळेच्या सभागृहाची पहाणी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या