Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यायेत्या 24 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लसीकरणासाठी करा नाव नोंदणी ; जाणून घ्या...

येत्या 24 एप्रिलपासून 18 वर्षांवरील लसीकरणासाठी करा नाव नोंदणी ; जाणून घ्या अधिक

नवी दिल्ली – येत्या 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व पात्र नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार लसीकरणासाठी येत्या 24 एप्रिलपासून नाव नोंदणी करता येणार आहे.

ही नोंदणी केंद्र सरकारच्या कोविन अ‍ॅप आणि cowin.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे.

- Advertisement -

लसीकरण नावनोंदणीसाठी फोटो आयडी प्रुफ, फोटो आयडी नंबर, लिंग, जन्मतारिख ही माहिती भरणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर लसीकरण नोंदणी होईल.

दरम्यान, सर्वात आधी 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात होती. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांना करोना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना कोव्हिड 19 लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे तसेच राज्य सरकारांना आता थेट लस उत्पादक कंपन्यांकडून लसीचे डोस विकत घेता येणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या