Thursday, May 2, 2024
Homeनगरनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; नायजेरीयातून आलेल्या महिलेला ओमिक्रॉनची लागण

नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव; नायजेरीयातून आलेल्या महिलेला ओमिक्रॉनची लागण

अहमदनगर/श्रीरामपूर | प्रतिनिधी

करोनाच्या (Covid-19) नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटने जगभरात हाहा:कार माजवला आहे. देशासह महाराष्ट्रात ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढत आहे.

- Advertisement -

करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन’ची लक्षणे काय?, कशी घ्याल काळजी?

दरम्यान नगर (ahmednagar) जिल्ह्यातही ओमिक्रॉन व्हेरिएंटचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. श्रीरामपूर शहरात नायझेरीया येथून आलेल्या महिलेचा ओमिक्राॅनचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्यामुळे नगर जिल्ह्ययातील पहिला ओमिक्राॅनचा रुग्ण श्रीरामपुरात (shrirampur) आढळून आला आहे.

श्रीरामपूर शहरातील वाॅर्ड क्र. 5, शिवाजीरोडवर राहत असलेली 41 वर्षीय महिला व तिचा 6 वर्षाय मुलगा हे दोघे 15 डिसेंबर 2021 रोजी नायजेरीया येथून श्रीरामपुरात आले होते.

ओमिक्रॉन व्हेरिएंटवर Covishield प्रभावी आहे का? अदर पूनावाला म्हणाले….

याबाबतची माहिती मिळताच तालुका वैद्यकिय अधिकारी श्रीमती देशमुख यांनी या मायलेकींची करोना तपासणी करुन त्याचे अहवाल नगर येथे पाठविले होते. यात हे दोघे मायलेक करोना पाॅझिटिव्ह आले. त्यानंतर वैद्यकीय विभागाने या दोघांचे ओमीक्राॅनचे नमुने नगर व पुणे येथे पाठविले.

त्याबाबतचा अहवाल मिळाला असता यात महिला ओमिक्राॅनची रुग्ण आढळून आली असल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी सांगितले. याबाबत प्रशासन सज्ज झाले असून नागरीकांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी केले आहे.

तसेच जिल्हा प्रशासन अर्लट झाले असून नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली आहे. आता आरोग्य खात्याला लसीकरणावर भर दयावी लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या