Thursday, May 2, 2024
Homeनगरराहाता तालुक्यातील ५३ गावात शुन्य रुग्ण

राहाता तालुक्यातील ५३ गावात शुन्य रुग्ण

पिंपरी निर्मळ (वार्ताहर)

ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर प्रशासनाकडुन नविन निर्बंध लागू केले जात असतांना राहाता तालुक्यातील साठ गावांपैकी ५३ गावांमध्ये करोनाची सक्रीय रुग्णसंख्या शुन्यावर आली असल्याचे दिलासादायक चित्र आहे. उर्वरीत सात गांवामध्येही केवळ दहा सक्रीय रुग्ण आहेत. तर चौदा गांवाचे शंभर टक्के प्रतिबंधात्मक लसीकरण झाले आहे.

- Advertisement -

Child Vaccination : आजपासून मुलांच्या लसीकरणाची नोंदणी; कशी कराल नोंदणी? कोणती लस देणार?

शासनाने ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर व करोनाचे रुग्ण वाढत असतांना नवीन निर्बंध लागू केले आहेत. राहाता तालुक्यात अरोग्य विभाग, महसुल प्रशासन, पंचायत समीती व गांवामधील स्थानिक प्रशासन यांच्या सामुहिक प्रयत्नामुळे तालुक्यातील करोना परीस्थिती नियंत्रणात असून ५३ गांवामध्ये३१ डिसेंबरच्या अहवालानुसार एकही रुग्ण नाही तर उर्वरीत सात गांवामध्ये केवळ दहा सक्रीय रुग्ण आहेत. तालुक्यातील बहुताश गावात करोनाचा प्रार्दुभाव ओसरत असल्याचे चित्र आहे. तालुक्यातील जास्त लोकसंख्या असलेल्या शिर्डी, लोणी बुद्रुक या गावामध्ये एकही सक्रीय रुग्ण नसल्याचे दिलासादायक चित्र आहे.

१५ ते १८ वयोगटासाठी उद्यापासून लस; यंत्रणा सज्ज, शाळाबाह्य मुलांनाही डोस

दि. ३१ डिसेंबरच्या अहवालानुसार तालुक्यातील एकुण सक्रीय रूग्ण संख्या केवळ १० आहे. यामध्ये राहाता ०१, लोणी खुर्द ०३, साकुरी ०२ सक्रीय रुग्ण आहेत. दैनंदिन सापडणाऱ्या रूग्णांमध्ये घट आल्याने सक्रीय रुग्णसंख्या असणाऱ्या गावांची संख्याही दर आठवड्यांत कमी होत आहे. लसीकरण, प्रशासकीय प्रयत्न, नागरिकांची सजगता यामुळे तालुक्यात रुग्णसंख्या नियंत्रणात असल्याचे दिलासादायक चित्र आहे. सध्या साई मंदीर दर्शनासाठी खुले झाले आहे. तसेच शाळाही सुरळीत सुरू झाल्या आहेत. ओमायक्रॉनच्या पार्श्वभुमीवर नागरिकांनी करोनाचे नियम पाळण्याचे व प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडुन केले जात आहे.

Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना ‘फादर ऑफ इंडियन नेव्ही’ का म्हणतात?

या गावांमध्ये झाले शंभर टक्के लसीकरण

तालुक्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणही मोठ्या प्रमाणात सुरू आहे. एलमवाडी, तरकसवाडी, चोळकेवाडी, धनगरवाडी, नांदुर खुर्द, एकरूखे, हसनापूर, डोन्हऱ्हाळे खु, सावळीविहीर खुर्द, सावळीविहीर बुद्रुक, नांदुर्खी , राजुरी, केलवड खुर्द, कोल्हार बुद्रुक या चौदा गांवामध्ये शंभर टक्के लसीकरण झाले आहे.

सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

- Advertisment -

ताज्या बातम्या