Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशCorona Update : देशात दैनंदिन रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ, महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय?

Corona Update : देशात दैनंदिन रुग्णांसह सक्रिय रुग्णसंख्येतही वाढ, महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय?

दिल्ली | Delhi

दोन महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेल्या करोनानं (Corona Virus) पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची (corona patients) संख्या वाढताना दिसतेय.

- Advertisement -

गेल्या २४ तासात २ हजार ३८० नवे रुग्ण आढळून आले आहे. तर तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नवीन मृत्यूंसह देशातील मृतांची संख्या ५ लाख २२ हजार ०६२ इतकी झाली आहे. सध्या देशातील सक्रीय करोना रुग्णांची संख्या १३ हजार ४३३ इतकी झाली आहे.

दरम्यान काल देशात १ हजार ५४७ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी २५ लाख १४ हजार ४७९ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. यासह देशातील सध्याचा दैनंदिन करोना संसर्गाचा दर ०.५३ टक्के इतका आहे. तसेच सध्याचा रिकव्हरी रेट ९८.७६ टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेट ०.४३ टक्के आहे.

महाराष्ट्रातील सद्यस्थिती काय?

महाराष्ट्रात करोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना दिसत आहे. बुधवारी राज्यात १६२ रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या देखील एक हजारांखाली आली आहे. राज्यात सध्या ६९० सक्रिय रुग्ण आहे. तसेच गेल्या २४ तासात एकही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यात गेल्या २४ तासात १३२ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या