Monday, May 6, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : देशभरात २४ तासात अडीच लाख करोनाबाधित, महाराष्ट्रातील स्थिती काय? वाचा...

COVID19 : देशभरात २४ तासात अडीच लाख करोनाबाधित, महाराष्ट्रातील स्थिती काय? वाचा ताजी आकडेवारी

दिल्ली | Delhi

मागच्या काही दिवसांपासून देशात सातत्याने ३ लाखापेक्षा जास्त करोनाबाधित (corona update) आढळत होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. देशात गेल्या २४ तासात अडीच लाख बाधित आढळले आहेत.

- Advertisement -

Mouni Roy : मौनी रॉयच्या शाही विवाहसोहळ्याचे खास फोटो बघितले का?

भारतात करोनाच्या नव्या २ लाख ५१ हजार २०९ रुग्णांची नोंद झाली (india New Corona Cases Increased) आहे. तर ६२७ जणांचा मृत्यू करोनाने झाला (India Corona Death) आहे. तसेच गेल्या २४ तासांत ३ लाख ४७ हजार ४४३ रुग्णांनी करोनावर यशस्वीरित्या मात केली (India Corona Recover) आहे.

कोव्हॅक्सीन, कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी; पण मेडिकलमध्ये नाही तर ‘या’ ठिकाणी मिळणार

सध्या भारतात २१ लाख ०५ हजार ६११ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १५.८८ टक्क्यांवर आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात १६४ कोटीहुन अधिक लसीचे डोस नागरिकांना देण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील स्थिती काय?

महाराष्ट्रात करोनाचा वेग हळूहळू कमी होत आहे. गुरुवारी राज्यात करोनाचे २५ हजार ४२५ नवीन रुग्ण आढळले आहेत तर ४२ रूग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच गुरुवारी राज्यात ३६ हजार ७०८ रुग्ण करोनावर मात करुन घरी परतले आहेत. आतापर्यंत ७१ लाख ९७ हजार ००१ बाधितांनी करोनावर मात केली आहे.

‘प्रियांका चोप्रा-निक जोनास’प्रमाणेच ‘या’ सेलिब्रेटींच्या घरातही सरोगसीद्वारे पाळणा हलला

- Advertisment -

ताज्या बातम्या