Thursday, May 2, 2024
HomeनगरCOVID19 : जिल्ह्यात आज तीन हजार ६१२ रुग्णांची नोंद

COVID19 : जिल्ह्यात आज तीन हजार ६१२ रुग्णांची नोंद

अहमदनगर l प्रतिनिधी

अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन दिवसांनंतर करोना बाधितांची आकडेवारी चार हजारांच्या आत आली असून काल बाधितांपेक्षा करोना मुक्तांची संख्या अधिक असल्याने करोनावर उपचार सुरू असणार्‍यांची संख्या एक हजारांनी कमी झाली. शनिवारच्या बाधितांमध्ये संगमेनर तालुक्यात सर्वाधिक असल्याचे दिसून आले.

- Advertisement -

जिल्ह्यात काल पहिल्या 4 हजार 182 रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे करोनातून मुक्त झालेल्यांची संख्या 1 लाख 77 हजार 286 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 86.07 टक्के इतके झाले आहे. काल नव्याने 3 हजार 612 नवे करोना रुग्ण सापडल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या 26 हजार 419 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 1 हजार 18, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 1 हजार 945 आणि अँटीजेन चाचणीत 649 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 29, अकोले 170, जामखेड 1, कर्जत 107, कोपरगाव 19, नगर ग्रामीण 46, नेवासा 98, पारनेर 94, पाथर्डी 138, राहता 92, राहुरी 56, संगमनेर 78, शेवगाव 2, श्रीगोंदा 12, श्रीरामपूर 51, कँटोन्मेंट बोर्ड 6, मिलिटरी हॉस्पिटल 15 आणि इतर जिल्हा 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 345, अकोले 190, जामखेड 11, कर्जत 23, कोपरगाव 72, नगर ग्रामीण 199, नेवासा 120, पारनेर 70, पाथर्डी 31, राहाता 128, राहुरी 75, संगमनेर 361, शेवगाव 24, श्रीगोंदा 44, श्रीरामपूर 143, कँटोन्मेंट बोर्ड 52 आणि इतर जिल्हा 53 आणि इतर राज्य 4 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत 649 जण बाधित आढळुन आले. मनपा 54, अकोले 4, जामखेड 1, कर्जत 97, कोपरगाव 55, नगर ग्रामीण 29, नेवासा 23, पारनेर 91, पाथर्डी 24, राहाता 15, राहुरी 133, संगमनेर 3, शेवगाव 12 श्रीगोंदा 66, श्रीरामपूर 35 आणि इतर जिल्हा 7 अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान शनिवारी 20 करोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून यामुळे करोना बळींची संख्या आता 2 हजार 282 झाली आहे.

असे आहेत बाधित

संगमनेर 442, नगर मनपा 428, अकोले 364, नगर ग्रामीण 274, राहुरी 264, पारनेर 255, नेवासा 241, राहाता 232, श्रीरामपूर 229, कर्जत 227, पाथर्डी 193, कोपरगाव 146, श्रीगोंदा 122, अन्य जिल्हा 64, भिंगार 58, शेवगाव 38, लष्कार रुग्णालय 15, जामखेड 13 आणि अन्य राज्य 4 असे बाधित आहेत.

26 हजार अँटीजेन किट

गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात करोनाच्या तात्काळ चाचणीसाठी आवश्यक असणार्‍या अँटीजेन किटची चणचण होती. मात्र, जिल्हा शासकीय रुग्णालयाने 13 हजार आणि अन्य योजनेतून जिल्हा परिषदेने 13 हजार अँटीजेन किट खरेदी केल्या आहेत. यामुळे जिल्ह्यासाठी 26 हजार करोना चाचणीच्या अँटीजेन किट उपलब्ध झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या