Thursday, September 19, 2024
Homeदेश विदेशCOVID19 : दिलासादायक! भारतातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर, महाराष्ट्रातील स्थिती काय?

COVID19 : दिलासादायक! भारतातील रिकव्हरी रेट ९७.१७ टक्क्यांवर, महाराष्ट्रातील स्थिती काय?

दिल्ली | Delhi

- Advertisement -

देशात गेल्या तीन ते चार महिन्यापासून करोनाच्या दुसऱ्या लाटेने (Corona Second Wave) अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३४ हजार ७०३ नवे करोना रुग्ण (New Covid19 Patient) आढळले असून ५५३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या ३ कोटी ०६ लाख १९ हजार ९३२ इतकी झाली आहे.

तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू (Covid19 death) झालेल्यांची संख्या ४ लाख ०३ हजार २८१ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ५१ हजार ८६४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ९७ लाख ५२ हजार २९४ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या ४ लाख ०३ हजार २८१ रुग्णांवर उपचार आहेत.

देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण ३५ कोटी ७५ लाख ५३ हजार ६१२ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ४५ लाख ८२ हजार २४६ लसीचे डोस सोमवारी एका दिवसात देण्यात आलेत. (corona vaccination update)

महाराष्ट्रातील स्थिती काय? (Maharashtra corona update)

महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात आढळलेल्या करोनाबाधितांपेक्षा जवळपास दुप्पट रूग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले. राज्यात सोमवारी ६ हजार ७४० नवीन करोनाबाधित आढळले, तर १३ हजार २७ रूग्ण करोनातून बरे झाले. राज्यात ५१ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ५८ लाख ६१ हजार ७२० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या