Friday, May 3, 2024
Homeनगरअरे आवरा यांना! चोरट्यांनी चोरुन नेली स्मशानभूमीतील शवदाहिनी

अरे आवरा यांना! चोरट्यांनी चोरुन नेली स्मशानभूमीतील शवदाहिनी

करंजी l प्रतिनिधी

दरोड्यासह गंभीर चोऱ्याबरोबरच शेतकऱ्यांच्या विविध शेती अवजारांच्या चोऱ्या झालेले प्रकार नेहमी ऐकवात येतात. मात्र चोरांनी चक्क स्मशानभूमीतील लोखंडी शवदाहीनीच चोरून नेल्याने सातवडसह कान्होबावाडीतील मयत व्यक्तींचा अंत्यविधी करण्याची गैरसोय झाली आहे.

- Advertisement -

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सातवड ग्रामस्थांची कान्होबावाडी गावाजवळ स्मशानभूमी आहे. स्मशानभूमीच्या आजूबाजूला कुठेही लोकवस्ती नसल्यामुळे या एकांत परिसराचा फायदा उचलत अज्ञात भुरट्या चोरांनी चार दिवसापूर्वी चक्क स्मशानभूमीतील शवदाहीनी चोरून नेल्याचा प्रकार एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत आल्यानंतर उपस्थितांच्या लक्षात आला.

त्यानंतर सातवडसह कान्होबावाडी ग्रामस्थांनी देखील कपाळाला हात लावत चोरांच्या या कृत्याचा निषेध व्यक्त करत कशाची चोरी करावी याचे देखील भान आता चोरट्यांना राहिले नसल्याचा म्हणत आपला संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे सातवडसह कान्होबावाडी ग्रामस्थांची देखील अंत्यविधी करण्याची गैरसोय होऊन बसल्याने स्मशानभूमीला देखील संरक्षण म्हणून एखादा सुरक्षारक्षक ठेवण्याची वेळ ग्रामपंचायतीवर येते की काय अशी परिस्थिती आता निर्माण होऊ लागली आहे.

शवदाहिनी चोरी गेलेला प्रकार खरा असून यामुळे मयत व्यक्तीच्या अंत्यविधीची गैरसोय झाली आहे. परंतू लवकरच स्मशानभूमीच्या जागेवर नवीन पत्र्याचे शेड व शवदाहीनी उभारण्यात येणार आहे.

राजेंद्र पाठक सरपंच सातवड

- Advertisment -

ताज्या बातम्या