Saturday, May 9, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCricket Asia Cup 2025: India Vs Oman - भारताचा ओमानवर २१ धावांनी...

Cricket Asia Cup 2025: India Vs Oman – भारताचा ओमानवर २१ धावांनी विजय

आशिया कप २०२५ चा भारत विरुद्ध ओमानचा सामना आज अबू धाबीतील शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला. अभिषेक शर्मा,अक्षर पटेल व तिलक वर्माच्या धडाकेबाज फलंदाजीने ओमानच्या संघासमोर १८९ धावांचे लक्ष दिल्या नंतर ओमानच्या संघाने ४ गडी बाद १६७ धावा केल्या. भारताचा ओमानवर २१ धावांनी विजय

नाणेफेक जिंकून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा व शुभमन गिल सलामीला फलंदाजीस आले. सामन्याच्या दुसऱ्या षटकात फैसल शहाच्या गोलंदाजीवर शुभमन गिल ८ चेंडूत ५ धावा करत बाद झाला. सलामीला आलेल्या अभिषेक शर्मा नी तुफान फटके बाजी करत १५ चेंडूत ३८ धावा करत आठव्या षटकात जे रामानंदी कडून झेल बाद झाला.पाठोपाठ हार्दिक पंड्या १ धावसंख्या करत जे रामानंदी करवी धावचीत झाला.अक्षर पटेलने १३ चेंडूत २६ धावा करत बाराव्या षटकात अमीर कलीमच्या गोलंदाजीवर विनायक शुक्ला करवी झेल बाद झाला.

- Advertisement -

१४ व्या षटकात शिवम दुबे ५ धावा करत जे रामानंदी करवी झेल बाद झाला.संजू स‍ॅमसनने धडाकेबाज फलंदाजी करत ४५ चेंडूत ५६ धावा केल्या.१८ व्या षटकात आर्यन बिस्ट कडून संजू स‍ॅमसन ५६ धावा करत झेल बाद झाला. तिलक वर्माने आक्रमक फलंदाजी करत १८ चेंडूत २९ धावा करत झिकरिया इस्लाम करवी झेल बाद झाला.हर्षित राणाने ८ चेंडूत १३ नाबाद केल्या. २० व्या षटका अखेर भारतीय संघाने ८ गडी बाद १८८ धावा केल्या.

भारतीय संघाने दिलेल्या १८९ धावांच्या आव्हाना नंतर ओमानच्या संघाकडून जतिंदर सिंघ आणि अमीर कलीम प्रथम फलंदाजीस आले.सामन्याच्या आठव्या षटकात कुलदीप यादवने जतिंदर सिंघला क्लीन बोल्ड करत ओमानच्या संघाचा पहिला गडी बाद केला.जतिंदर सिंघने ३३ चेंडूत ३२ धावा केल्या.

अठराव्या षटकात हर्षित राणाच्या गोलंदाजीवर हार्दिक पंड्याने अमीर कलीमला झेल बाद केले. अमीर कलीमने ४६ चेंडूत ६४ धावा केल्या.एकोनावेसाव्या षटका च्या अखेरीस हम्माद मिर्झाने ३३ चेंडूत ५१ धावा करत बाद झाला तर विनायक शुक्ला १ धाव संख्या करून तंबूत परतला. जे.रामानंदीने ने ५ चेंडूत १२ धावा केल्या.

अखेरच्या षटकात ओमानच्या संघाने चार गडी बाद १६७ धावा केल्या. भारतीय संघाने ओमानवर २१ धावांनी विजय मिळविला.

ताज्या बातम्या

बहुमताचा

TVK Vijay: मोठी बातमी! विजयच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा; बहुमताचा आकडा पार,...

0
तामिळ नाडू | Tamil Naduदेशाचं लक्ष लागलेल्या तामिळनाडूतील सत्तास्थापनेत आता अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाच्या अडचणी दूर झाल्या आहेत. टीव्हीके पक्षाला व्हीसीके पक्षाने...