Monday, November 23, 2026
Homeक्राईमNashik Crime News : गाेळीबार करणारे गजाआड; आंबेकरसह साथीदार अटकेत

Nashik Crime News : गाेळीबार करणारे गजाआड; आंबेकरसह साथीदार अटकेत

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आडगाव पोलीस ठाण्याच्या (Aadgaon Police Station) हद्दीत १८ ऑक्टाेबर राेजी भरदिवसा विवाहितेच्या पतीवर झालेल्या गोळीबार प्रकरणातील दोन पसार संशयितांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. रामवाडी रोडवरील (Ramwadi Road) कोशिरे मळा परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. राहुल सोमनाथ आंबेकर (वय ३५, रा. आर्चि अपार्टमेंट, भैरवनाथनगर, पंचक जेलरोड) आणि विकास वाळूबा सोनवणे (वय २५, रा. मु.पो. जळगाव नेऊर, ता. जि. नाशिक) अशी अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

- Advertisement -

आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या १८ तारखेला भरदिवसा एका विवाहितेच्या पतीवर गोळीबार (Firing) करण्याची घटना घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेनंतरपासून दोन्ही संशयित पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले होते. दोन्ही संशयित रामवाडी रोडवरील कुशीरे मळा परिसराजवळ असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार प्रवीण वाघमारे आणि विशाल देवरे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने रामवाडी रोड परिसरात सापळा रचला आणि दोन्ही संशयितांना (Suspected) शिताफीने ताब्यात घेतले. पुढील कारवाईसह तपासासाठी दोघांनाही आडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

​पोलीस पथकाची कामगिरी

​पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, प्रशांत मरकड, संदीप भांड, विशाला काठे, विशाल देवरे, अमोल कोष्टी, सुक्राम पवार आणि समाधान पवार यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

ताज्या बातम्या

सहकारी

राज्यातील सहकारी साखर कारखानदारीला घरघर; ऊस गाळप करणाऱ्या कारखान्यांची संख्या १००...

0
कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष समिती मुंबई | प्रतिनिधीसहकाराची पंढरी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारीला घरघर लागल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. दोन दशकांपूर्वी राज्यात २०० पेक्षा...