Monday, May 6, 2024
Homeजळगावमाझ्याशी लग्न कर, अन्यथा...मुलीला दोघांची धमकी

माझ्याशी लग्न कर, अन्यथा…मुलीला दोघांची धमकी

जळगाव – jalgaon

शहरातील सिंधी कॉलनीत (Sindhi Colony) राहणार्‍या एका तरुणीला लग्न करण्यासाठी वारंवार फोन करुन धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दिल्लीत राहणार्‍या सोहेल खालीद खान व आकाश लक्ष्मण राठी या दोघां विरुद्ध (midc police) एमआयडीसी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सोहेल याने मुलीशी लग्न करण्याच्या हेतूने वारंवार तीला फोन व मॅसेज केले. माझ्याशी लग्न कर नाहीतर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. तर आकाश याने देखील फोन करुन धमकावले. या दोघांच्या त्रासाला कंटाळुन मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहाय्यक फौजदार अतुल वंजारी तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या