Saturday, November 9, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सुडाचे कारस्थान उघड; टाेळीकडून धारदार काेयते जप्त

Nashik Crime News : सुडाचे कारस्थान उघड; टाेळीकडून धारदार काेयते जप्त

तिघा अल्पवयींनाचा सहभाग उघड

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

सन २०१८ मध्ये संत कबीरनगरमध्ये झालेल्या वाघमारे खुनाचा सूड उगविण्यासाठी एक टाेळी कटकारस्थान रचत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. धारदार कोयते बाळगून टवाळखोरी करणाऱ्या चाैघांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट (Crime Branch) एकने अटक (Arrested) केली आहे. या चौघातील तिघे हे अल्पवयीन असून, त्यांच्याकडील बॅगेतून चार धारदार कोयते जप्त करण्यात आले आहेत. 

- Advertisement -

हे देखील वाचा : गंगापूर धरणात ‘इतके’ टक्के पाणीसाठा; जिल्ह्यातील इतर धरणांतील स्थिती मात्र चिंताजनक

याबाबत अधिक माहिती अशी की, राहुल गौतम वाघमारे (१८, रा. बुद्धविहार, संत कबीरनगर) असे संशयिताचे नाव असून त्याच्या समवेत १७ वर्षाचे दोन व १६ वर्षांचा एक अशा तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युनिट एकचे अंमलदार मिलिंदसिंग परदेशी यांना काही संशयित कॉलेजरोडच्या मॉडेल कॉलनी परिसरामध्ये संशयितरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली होती. ती माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर, पथकाने मॉडेल कॉलनीतील रेणुका गॅरेजसमोरील यशवंत कॉलनीत सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले.

हे देखील वाचा : मंत्री भुसेंनी नाशिक-ठाणे महामार्गावरील रस्ते समस्यांचा घेतला आढावा

पोलिसांनी (Police) संशयितांकडे असलेल्या काळ्या बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये धारदार चार कोयते आढळून आले आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलिसात (Gangapur Police) गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना गंगापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तपास हवालदार मोरे हे करीत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक सुगन साबरे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, अप्पा पानवळ, मुक्तार शेख, राजेश राठोड, अमोल कोष्टी, किरण शिरसाठ यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

हे देखील वाचा : Maharashtra Rain Update : ‘या’ ९ जिल्ह्यांना IMD चा सतर्कतेचा इशारा; नाशिक, नगरमध्ये कसा असेल पाऊस?

टाेळी बनविण्याचे कामकाज

संत कबीरनगरमध्ये १५ जून २०१८ रोजी रात्री राजू शेषराव वाघमारे (४५) याच्यावर संशयित संजय लक्ष्मण खरात, कल्पेश संजय खरात (दोघे रा. संत कबीरनगर झोपडपट्टी), सुंदर लक्ष्मण खरात, प्रशांत सुंदर खरात (रा. गौतमनगर झोपडपट्टी, अंबड) यांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्यात खून केला होता. आता कोयत्यासह अटक केलेला राहुल वाघमारे हा मृत राजू वाघमारे याचा नातलग असून, त्याच्या मनात खुनातील संशयित करात टोळीविषयी सुडाची भावना आहे. त्यासाठी तो टोळी तयार करीत असल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. संशयित खरात टोळीतील सदस्यांचा ‘गेम’ करण्याचा कारस्थान रचण्यासाठीच तो टवाळखोरांची टोळी व कोयत्यासारखे धारदार हत्यारे बाळगत असल्याचेही समोर आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या