Sunday, May 19, 2024
Homeनगरश्रीरामपूरमध्ये गोवंश जनावरांची ४००० कातडी जप्त

श्रीरामपूरमध्ये गोवंश जनावरांची ४००० कातडी जप्त

श्रीरामपूर(प्रतिनिधी)

शहरातून मोठया प्रमाणात गो मास पकडल्यानंतर पोलिसांनी काल सायंकाळी हजारो गोवनशीय जनावरांची कातडी जप्त केली. त्यामुळे श्रीरामपूर शहरात अवैधरित्या तसेच चोरून गोवंशीय जनावरांची कत्तल तसेच गो मास विक्री होत असल्याचे उघड झाले आहे.

- Advertisement -

शहरातील वार्ड नंबर २ परीसरात असलेल्या, अहिल्यादेवी नगर याठिकाणी मोठ्या प्रमाणात गोवंशीय जनावरांची कातडी असल्या संदर्भात, पोलीस निरीक्षक संजय सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच पोलीस निरीक्षक संजय सानप यांच्या आदेशावरून, शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संभाजी पाटील,पोलीस नाईक अमोल जाधव ,सचिन बैसाने,पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, राहुल गायकवाड, तपास पथकाचे राहुल नरवडे, किशोर जाधव,गौतम लगड आदी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

त्यावेळी दिपक धोंडीराम नरवडे यांच्या मालकीच्या जागेत असलेल्या घराबाहेर, एम एच १५ सी के ८०१० क्रमांकाच्या एशीअर टेम्पोत, गोवंशीय जनावरांची कातडी भरतांना पोलिसांनी पकडकी, सदरची कातडी अहमदनगरयेथील एका व्यापाऱ्याच्या मालकीचे असल्याची माहिती मिळाली. ज्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकला त्याठिकाणी, अंदाजे ३ ते ४ हजार गोवंशीय जनावरांची कातडी ताब्यात घेण्यात आली आहेत. या गोवंशीय जनावरांची कातडी लाखो रुपयांची असून, ही कातडी आली कुठून,? श्रीरामपूरात या गोवंशीय जनावरांची कत्तल झाली तर नाही ना, असे अनेक प्रश्न पोलिसांच्या या कारवाईमुळे निर्माण झाले आहेत. सायंकाळच्या सुमारास ही कारवाई झाल्याने, उशिरा पर्यंत ,गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शहर पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कारवाईचे नागरिकांमधून कौतुक केले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या