Thursday, May 2, 2024
Homeनगरश्रीरामपूरच्या तरुणीवर नगरमध्ये अत्याचार

श्रीरामपूरच्या तरुणीवर नगरमध्ये अत्याचार

अहमदनगर | Ahmedagar

अश्‍लिल फोटो सोशल मिडीयावर व्हायरल (Pornographic photos go viral on social media) करण्याची धमकी देत श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील तरूणीवर नगरमधील (Ahmednagar) तरूणाने अत्याचार केला.

- Advertisement -

अल्पवयीन मुलीशी चाळे चिडीमाराच्या अंगाशी

बुधवारी सायंकाळी नगर शहरातील सावेडी (Savedi) उपनगरात एका हॉटेलवर ही घटना घडली. पिडीत तरूणीने तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofhkhana Police) दिलेल्या फिर्यादीवरून अमित प्रकाश चांदणे (रा. जय भवानी चौक, वडगाव गुप्ता ता. नगर) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

मुळची श्रीरामपूर तालुक्यातील फिर्यादी तरूणी सध्या नगर शहरात राहते. बुधवारी सायंकाळी अमित चांदणे याने त्या तरूणीला फ्लॅट दाखविण्याचा व वकीलास भेटण्याचा बहाण्याने दुचाकीवरून सावडी उपनगरातील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तरूणीला कोल्ड्रिंक्स (Cold drinks) पाजून तिच्या इच्छेविरूद्ध बळजबरीने अंगलटपणा केला.

तरूणीने अमितला विरोध केला असता त्याने तिचे अश्‍लिल फोटो (Pornographic photos) काढले. ते फोटो सोशल मिडीयावर (social media) व्हायरल करण्याची धमकी देत, तरूणीवर अत्याचार केला. घडलेला प्रकार बाहेर कोणाला सांगितल्यास तुला जीवे ठार मारून टाकेल, अशी धमकी अमितने पिडीत तरूणीला दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे करीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या