Thursday, April 23, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime : भोंदू अशोक खरातचा माज पोलिसांनी उतरवला; खाक्या दाखवताच...

Ashok Kharat Crime : भोंदू अशोक खरातचा माज पोलिसांनी उतरवला; खाक्या दाखवताच म्हणाला ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’

नाशिक | Nashik

महिलांचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी अशोक खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याला नाशिकच्या गुन्हे शाखेने बुधवार (दि.१८) रोजी अटक केली. यानंतर त्याला नाशिक सत्र न्यायालायने मंगळवार (दि.२४) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली असून, याप्रकरणाचा तपास एसआयटी कडून केला जात आहे. खरातविरुद्ध बलात्कारासह (Rape) जादुटोणाविरोधी कायद्यान्वये तिसरा गुन्हा नोंद झाला आहे. यानंतर काल (रविवारी) गुन्हे शाखेच्या युनिट एकमध्ये त्याचा चांगलाच पाहुणचार करण्यात आला.

- Advertisement -

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरातच्या कुकर्मांचा पेनड्राइव्ह सापडला; गरोदर महिलेवरही अत्याचार

नाशिकमधील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Sandeep Karnik) यांनी गुन्हेगारांसाठी ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम हाती घेतली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली होती. पंरतु, भोंदू अशोक खरातला काल गुन्हे शाखेच्या युनिट १ मध्ये पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवल्याने ही मोहीम पुन्हा जोमाने सुरु झाल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेच्या कार्यालयातून ‘महाप्रसादाचा’ लाभ घेऊन बाहेर पडताना खरातची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. ज्यावेळी तो युनिट एक मधून बाहेर पडला त्यावेळी गेल्या काही काळात नाशिक पोलिसांचे ब्रीद वाक्य झालेले ‘नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला’, हे देखील पुटपुटतांना दिसला.

दरम्यान, अशोक खरात ज्यावेळी युनिट एकच्या कार्यालयातून (Unit One) बाहेर आला त्यावेळी लंगडत आणि कण्हत चालत होता. तसेच त्याला पाय उचलणेही जड झाले होते. तो कसाबसा पोलिसांसोबत गाडीत जाऊन बसला. यावेळी त्याने स्वत:ची मान शेजारच्या पोलीस कर्मचार्‍याच्या अंगावर टाकली होती. महापालिका निवडणुकीच्या आधी नाशिक शहरात गुन्हेगारी वाढली होती. त्यामुळे ही गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ‘नाशिक जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला’ ही मोहीम सुरू करत पोलिसी खाक्या दाखविल्या. यात आरपीआय आठवले गटाचा जिल्हाप्रमुख प्रकाश लोंढेसह त्याची टोळी, ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये दाखल झालेले मामा राजवाडे, अजय बागुल यांच्या सोबत शहरातील अनेक नामांकित गुन्हेगारांचा कायद्याचा बालेकिल्ला केला होता. त्यानंतर आता अशोक खरातच बालेकिल्ला केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : बड्या धेंडांची भागीदारी; खरातच्या ‘मायाजाला’त प्रशासकीय अधिकारी, राजकारण्यांचे नातलग

ताज्या बातम्या

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक : पाच वाजेपर्यंत ‘एवढे’ टक्के मतदान

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri बहुचर्चित राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत (Rahuri Assembly By Election) आज गुरुवारी (23 एप्रिल) मतदानाच्या दिवशी अखेरच्या क्षणीही माजी मंत्री प्राजक्त तनपुरेंनी त्यांच्याविषयीची संदिग्धता...