Monday, August 17, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : बड्या धेंडांची भागीदारी; खरातच्या 'मायाजाला'त प्रशासकीय अधिकारी,...

Ashok Kharat Crime News : बड्या धेंडांची भागीदारी; खरातच्या ‘मायाजाला’त प्रशासकीय अधिकारी, राजकारण्यांचे नातलग

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

स्वयंघोषिक कॅप्टन खरात (Ashok Kharat) याच्या नावे असलेल्या कोट्यवधींच्या मालमत्तेचे एकामागून एक धक्कादायक पदर आता उलगडू लागले आहेत. केवळ जमीन खरेदी-विक्रीचा हा व्यवहार नसून यात राजकारणी, काही बडे प्रशासकीय अधिकारी आणि त्यांच्या नातेवाईकांचे मोठे जाळे गुंतल्याचे समोर येत आहे. प्राप्त झालेल्या अधिकृत सातबारा उताऱ्यांवरून खरातच्या अनेक मालमत्तांमध्ये हे ‘बडे मासे’ केवळ पडद्यामागून नव्हे, तर कागदोपत्री भागीदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Devendra Fadnavis : “खरात प्रकरणाचे सर्वाधिक पुरावे माझ्याकडे, कुणीही …”; CM फडणवीसांच्या ‘त्या’ विधानामुळे अनेकांचे धाबे दणाणले

तपासलेल्या कागदपत्रांनुसार, नाशिकमधील (Nashik) पाथर्डी, सिन्नर आणि विल्होळी यांसारख्या मोक्याच्या ठिकाणच्या जमिनींमध्ये खरात याच्यासोबत इतर व्यक्तींची नावे भोगवटादार म्हणून नोंदवलेली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील काही नावे ही शहरातील नामवंत राजकारण्यांच्या नातेवाईकांची आणि काही निवृत्त तसेच कार्यरत असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मिळतीजुळती आहेत. पाथर्डी-२ येथील एका सर्वे क्रमांकात तर एकाच प्लॉटवर अनेक प्रभावशाली व्यक्तींच्या नावांची सामायिक नोंद आहे, ज्यातून या मालमत्तांमध्ये काही टक्के वाटा देऊन राजकीय संरक्षण मिळवल्याचा संशय आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : चौकशीसाठी खरातला SIT ने अज्ञातस्थळी हलवलं, मंदिरातील पुजाऱ्यालाही उचललं; IPS तेजस्वी सातपुतेंकडून विशेष खबरदारी

अशोककुमार एकनाथ खरात याच्या नावावर अनेक मालमत्ता असतानाच त्याच्या कुटुंबातील (Family) महिलांच्या नावेही व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. सुगंधाबाई एकनाथ खरात, कल्पना अशोककुमार खरात, वैशाली आनंद खरात आणि सृष्टी अशोककुमार खरात यांच्या नावे पाथर्डी परिसरात अनेक अकृषीक (एनए) प्लॉटची नोंद आहे. हे व्यवहार केवळ गुंतवणुकीचा भाग नसून, काळा पैसा पांढरा करण्यासाठी किंवा सत्ताधाऱ्यांच्या हितसंबंधांना जपण्यासाठी तर केले गेले नाहीत ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : खरात प्रकरण तपासात फॉरेन्सिकची एन्ट्री; तीन गुन्ह्यांचा स्वतंत्र तपास, मशिनरी, CCTV, व्हिडिओंची पडताळणी

राजकीय वरदहस्त, प्रशासकीय साटेलोटे

अनेकांनी आपल्या मालमत्तेत खरातला सहभागी करून घेतले आहे किंवा खरातला मालमत्तेत वाटा दिला आहे. या व्यवहार पद्धतीमुळे संशयाची सुई अधिक गडद होत आहे. अनेक सातबारा उताऱ्यांवर फेरफार नोंदींमध्ये झालेली वेगाने कामे आणि तांत्रिक प्रक्रियेतील सुटसुटीतपणा पाहता यामागे प्रशासकीय यंत्रणेचा आशीर्वाद असल्याचे चित्र आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून अनेक पांढरपेशी चेहरे समोर येण्याची शक्यता आहे. सामान्य जनतेच्या पैशातून उभारलेले हे अनधिकृत साम्राज्याचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतात की काय, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Crime News : अमेरिकेची वारी घडवली, परतीच्या प्रवासासह शस्त्रक्रियेचा सारा खर्चही केला; भक्तांनी खरातवर उधळले करोडो रुपये

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...