Wednesday, June 10, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : खरातच्या कुकर्मांचा पेनड्राइव्ह सापडला; गरोदर महिलेवरही अत्याचार

Ashok Kharat Crime News : खरातच्या कुकर्मांचा पेनड्राइव्ह सापडला; गरोदर महिलेवरही अत्याचार

पोलिसांनी दाखवला बालेकिल्ला

नाशिक | Nashik

क्रुरकर्मा संशयित अशोककुमार खरात (Ashok Kharat) उर्फ कॅप्टन याच्या कूकर्माचा पेटारा पोलिसांसमोर आता उघड झाला आहे. खरातच्या गैरकृत्यांचे सबळ पुरावे असणारा पेनड्राइव्ह देण्याचा दावा एका तरुणाने केला आहे. यासह एका गर्भवती महिलेचा खरातने लैंगिक छळ केल्याप्रकरणी तरुणाने फिर्याद दिल्याने खरातविरुद्ध बलात्कारासह (Rape) जादुटोणाविरोधी कायद्यान्वये तिसरा गुन्हा नोंद झाला आहे. खरातचा पोलिसांनी नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असे वदवून घेतल्याने नाशिककरांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

- Advertisement -

नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत (Sarkarwada Police) २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्च २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अशोककुमार खरातविरुद्ध (रा. तृप्तबाला बंगला, गोविंदनगर) बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. तर रविवारी (दि. २२ मार्च) खरातच्या कार्यालयातील पूर्वाश्रमीच्या कर्मचाऱ्याने खरातविरुद्ध सरकारवाडा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यामध्ये सबळ पुरावे फिर्यादीने सादर केल्याने खरातच्या कुकर्माची संपूर्ण कुंडली पोलिसांसमोर आता खुली झाली आहे. त्यामुळे खरातच्या अडचणींत वाढ झाली असून, त्याची पोलीस कोठडी वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, खरातच्या फिर्यादीवरून वावी पोलिसांत (Vavi Police) डिसेंबर २०२५ मध्ये दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद आहे. शिर्डी पोलिसांत एका पीडितेच्या फिर्यादीवरुन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधवविरुद्ध फेब्रुवारी २०२६ महिन्याच्या अखेरीस गुन्हा नोंद आहे. १७ मार्च रोजी नाशिकच्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार एक आणि २२ मार्च रोजीचा दुसरा असे एकूण चार गुन्हे आता एसआयटीच्या (SIT) चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.

महिला अत्याचार आणि गर्भपात

सरकारवाडा पोलीस ठाण्यात ३३ वर्षीय पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिच्या सोबत १ फेब्रुवारी २०२० ते १८ मार्च २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. संशयित खरातने पीडितेला त्याच्या कार्यालयात बोलावले. कार्यालयात एकांतात असताना तांब्याचे बाटलीतील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी पीडितेशी शारीरिक संबंध केले. त्यातून पीडिता गर्भवती राहिल्याने खरातने औषध देत गर्भपात घडवून आणला. खरातच्या सांगण्यावरून धार्मिक विधीला पीडितेने नकार दिल्यास तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल, तुझे मुलांचे बरेवाईट होईल, असा दम खरातने भरल्याचे फिर्यादित नमूद आहे.

काय घडले?

पीडितेचा पती खरातच्या ओकस प्रॉपर्टीज या कार्यालयात नोकरीला होता. सन २०२३ मध्ये फिर्यादीची पत्नी (वय ३०) सात महिन्यांची गरोदर होती. संशयिताने बाळाचा जन्म सुरक्षित होण्यासह मुलगा होण्यासाठी विधी करण्याच्या बहाण्याने पीडितेला कॅबिनमध्ये बोलावले. फिर्यादीला कॅबिनबाहेर पाठवून, लाईट बंद करून, मंत्रांच्या नावाखाली संशयिताने पीडितेवर लैंगिक छळ व विनयभंग केला. ही घटना पीडितेच्या पतीला समजल्यानंतर त्याने खरातविरुद्ध वेळोवेळी सबळ पुरावे संकलित केले. हे खरातला समजल्यावर त्याने फिर्यादीसह कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली. यासह नोव्हेंबर २०२४ खरातने फिर्यादीला कामावरून काढून टाकल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

एआयमुळे गुन्हे

संशयित खरात याच्यासमवेत उभ्या असलेल्या किंवा त्याच्या कार्यालयात असलेल्या महिलांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यापैकी बहुतांश फोटो व व्हिडिओ एआयद्वारे तयार केलेले आहेत. यासह काही फोटो व व्हिडिओ मॉर्फ केलेले आहेत. यासंदर्भात सायबर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली असून, पीडितांसह संबंधित महिलांची बदनामी करणाऱ्या सोशल मीडिया वापरकर्त्यांवर गुहे नोंदविण्यात येणार आहेत.

एसआयटी तपासातून…

  • संशयित खरातची महाराष्ट्र पोलीस अकादमीतच्या गोपनीय ठिकाणी रविवारी (दि. २२) दिवसभर चौकशी
  • संशयित खरातची नवीन गुन्ह्यात नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकमार्फतही चौकशी
  • नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कौशल्यामुळे नवीन फिर्यादी समोर
  • खरातच्या गैरकृत्यांचे व्हिडिओ असलेला पेनड्राइव्ह पोलिसांना देण्याचे फिर्यादीकडून मान्य
  • संशयिताचे मोठे प्रस्थ व ओळखीमुळे फिर्यादी सुरुवातीला तक्रार देण्यास भीत होता
  • भविष्य सांगण्यासह धार्मिक विधींच्या नावाखाली अघोरी कृत्ये खरात नागरिकांना फसवायचा.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....