Monday, May 25, 2026
Homeक्राईमAshok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल...

Ashok Kharat Crime News : पाप झाकण्यासाठी खरातचा नीच डाव! पीडितेची ढाल करत ऑफिसबॉयला बनवले ‘बळीचा बकरा’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकसह (Nashik) राज्याला हादरवून सोडणाऱ्या ‘खरात एपस्टाईन फाइल्स प्रकरणात एक अत्यंत घृणास्पद वास्तव समोर आले आहे. स्वतःच्या विकृत वासनेसाठी अनेकानेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अशोक खरातने (Ashok Kharat) कायद्याच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आपल्याच ऑफिसबॉयचा ‘बळीचा बकरा’ म्हणून वापर केल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे, ज्या पीडितेचे शोषण केले, तिलाच ढाल बनवून खरातने हा खेळ खेळला असून, तपासात धक्कादायक धागेदोरे एसआयटीच्या (SIT) हाती लागले आहेत.

- Advertisement -

खरातच्या ओजस प्रॉपर्टीज कार्यालयात कामाला असलेल्या नीरज याच्या गर्भवती पत्नीवर (Wife) खुद्द खरातनेच लैंगिक अत्याचार केला होता. या कृत्याची घृणा मनात ठेवून नीरजने खरातला उघडे पाडण्यासाठी कार्यालयात ‘स्पाय’ कॅमेरे लावले. या कॅमेऱ्यात कैद झालेले महिलांवरील अत्याचाराचे पुरावे जेव्हा नीरजने पीडितांना दाखवण्यास सुरुवात केली, तेव्हा खरातच्या पायाखालची वाळू सरकली.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : कुत्र्याचा बळी दिला, मरणाच्या दाराशी असलेल्या युवकाच्या उशाला पुडी ठेवली; विकृत खरातला होता अघोरी पूजाअर्चेत पहिल्यापासून इंटरेस्ट

आपले ‘पापाचे साम्राज्य’ आता उघड्यावर येणार, हे लक्षात येताच त्याने बचावासाठी एक चाल खेळली. शिर्डीतील (Shirdi) एका २४ वर्षीय पीडितेने नीरजने दाखवलेल्या काही पुराव्यांच्या आधारे खरातला जाब विचारला, तेव्हा खरातने स्वतःचे गुन्हे मान्य करण्याऐवजी उलट त्या पीडितेवरच दबाव टाकला. आपली राजकीय आणि आर्थिक ताकद वापरून खरातने या पीडित तरुणीला घाबरवले आणि तिलाच हाताशी धरून नीरजविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यास भाग पाडले.

नीरजवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा

नीरजनेच तुझे फोटो व व्हिडिओ मॉर्फ केले आहेत आणि तो तुला बदनाम करतोय, असे खोटे सांगून खरातने या पीडितेच्या माध्यमातून नीरजवर आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करवून घेतला. स्वतःचे काळे कृत्य लपवण्यासाठी एका पीडित महिलेचा वापर करून नीरजला अडकवण्याचा खरातचा हा डाव नीचपणाचा कळस म्हणूण उघड झाला आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : मंत्रालयाजवळील पंचतारांकित हॉटेलमध्ये खोल्या कायमच्या बुक, ‘वर्षा’वर खास पूजेची चर्चा; खरातसाठी माजी मुख्यमंत्र्यांकडून विशेष खातीरदारी

बुरखा फाटला; खरातचा ‘प्लॅन’ फसला

खरातला वाटले की नीरजला जेलमध्ये पाठवून मोकळे होऊ, मात्र एसआयटीच्या सखोल तपासात हा बनाव समोर आला आहे. नीरजने कॅमेरे लावले असले, तरी त्यातील दृश्ये ही खरी होती आणि खरातनेच त्या महिलांचे शोषण केले होते. स्वतःला वाचवण्यासाठी खरातने रचलेला हा ‘बळीचा बकरा’चा डाव आता त्याच्यावरच उलटला असून, पोलिसांनी या प्रकरणातील सूत्रधार म्हणून खरातला गजाआड केले आहे.

हे देखील वाचा : Ashok Kharat Case : खरातच्या अघोरी कृत्यांनी नाशिक हादरले; SIT तपासात अंगावर शहारे आणणारी माहिती समोर

मुद्दे

  • स्वतःला वाचण्यासाठी पीडितेचा शस्त्र म्हणून वापर
  • ऑफिसबाँय नीरजच्या पत्नीवर अत्याचार करून उलट त्यालाच गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न
  • शिर्डी पोलिसांत दाखल तो गुन्हा म्हणजे खरातने रचलेले षड्यंत्र

हे देखील वाचा :  Jitendra Awhad : भोंदू खरातने पत्रकार तुपेची हत्या केली; आमदार जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

ताज्या बातम्या

Nashik TCS Case : एमआयएम नगरसेवक मतीन पटेल चौकशीसाठी पोलिसांसमोर...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राज्यात प्रचंड खळबळ उडवून देणाऱ्या नाशिकमधील कथित ‘कॉर्पोरेट जिहाद’, बेकायदेशीर धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida...