Wednesday, July 3, 2024
Homeक्राईमखांडगाव शिवारात पती-पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

खांडगाव शिवारात पती-पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

शेत नांगरणी का केली? ही शेती आमची आहे असे म्हणून पती-पत्नीला जातीवाचक शिवीगाळ करून जमावाने मारहाण केल्याची घटना खांडगाव शिवारात (ता. संगमनेर) रविवारी (दि. 2 जून) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसांत तिघांसह अनोळखी 20 ते 25 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, खांडगाव शिवारातील गट क्रमांक 96/2, 96/3 मधील शेत का नांगरले? ही शेती आमची आहे असे म्हणून अशोक शिंदे, साया शिंदे, बाळासाहेब बबन बालोडे यांच्यासह अनोळखी 20 ते 25 लोकांनी पतीला लोखंडी रॉडने मारहाण केली.

तर बालोडे याने जमीन देऊन टाकण्याचे तुमच्या डोक्यात येत नाही, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. त्यानंतर मारहाण झालेले पती पोलिसांत फिर्याद द्यायला जात असताना रस्त्यात त्यांची गाडी अडवून पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. यावेळी त्यांची पत्नी भांडणे सोडवण्यास आली असता अशोक शिंदे याने पत्नीचे केस ओढून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी पतीने शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून वरील तिघांसह अनोळखी 20 ते 25 जणांवर विनयभंग, मारहाण, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या