Friday, January 23, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime News : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला; भितीपोटी आत्महत्या केल्याचा संशय

Crime News : बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला; भितीपोटी आत्महत्या केल्याचा संशय

चाळीसगाव | मनोहर कांडेकर | Chalisagon

तालुक्यातील तरवाडे (Tarwade) येथून धनश्री उमेश शिंदे (वय ९) ही मुलगी दि.१२ डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून तरवाडे गावातून बेपत्ता झाली होती. गेल्या पाच दिवसांपासून तिचा तरवाडे गावासह परिसरात जळगाव (Jalgaon) येथील एलसीबीच्या टीमसह पोलीसांची (Police) १० पथके तिचा कसून शोध घेत होते. याशिवाय संपूर्ण परिसर ड्रोन कॅमेर्‍यांनी पिंजून काढला होता. पंरतु, मुलीचा शोध लागत नसल्यामुळे संपूर्ण यंत्रणा हतबल झाली होती.

- Advertisement -

यानंतर आज (मंगळवारी) संकाळी तरवाडे शिवारातीलच गणेश गरुड यांच्या शेतातील विहिरीत धनश्री हिचा मृतदेह आढळून आला. धनश्री हिने शिक्षिकेच्या (Teacher) पर्समधून पैसे काढून घेतले होते, तिच्या सामोर शिक्षिकेने वडिलांना फोन करुन दोघेजण उदया शाळेत या, असे सांगितले होते. त्यानंतर सांयकाळी ०५.१५ वाजेनतंर शाळा सुटल्यापासून धनश्री घरी गेली नव्हती. पाच दिवसांपासून तिचा पोलीस (Police) शोध घेत होते. एका शेतात तिची शाळेची बॅग आढळून आली होती.

YouTube video player

दरम्यान, त्यानंतर आज त्याच ठिकाणापासून १०० मीटरच्या अंतरावरील विहिरीत तिचा मृतदेह आढळून आला आहे. धनश्रीने भितीपोटी आत्महत्या (Suicide) केल्याचे सांगण्यात येत आहे.पंरतु, पोलीस या संपूर्ण घटनेचा कसून तपास करीत आहेत. तर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह (Dead Body) शवविच्छेदनासाठी पाठविण्याच्या हालचाली सुरु आहेत.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’ आजपासून

0
नाशिक | प्रतिनिधी Nashikदैनिक 'देशदूत' आयोजित गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६फला आजपासून (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेअभिनेते मिलिंद गुणाजी...