Friday, March 28, 2025
Homeक्राईमजमिनीच्या वादातुन बापाचा मुलानेच केला खुन

जमिनीच्या वादातुन बापाचा मुलानेच केला खुन

कोर्‍हाळे |वार्ताहार| Korhale

जमीन (Land) नावावर करून देत नाही म्हणून व्यसनाधीन झालेल्या मुलाने वृध्द पित्याचा लाकडी दांडक्याने मारहाण (Beating) करून खुन (Murder) केल्याची घटना राहाता (Rahata) तालुक्यातील कोर्‍हाळे येथे घडली. याबाबत राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) आरोपी अनिल गणपत कोळगे याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. जन्मदात्या बापाची हत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोर्‍हाळे (Korhale) जाधव वस्ती येथे कोळगे कुटुंबीय राहत असून गणपत संभाजी कोळगे (वय 80) हे आपल्या मुलगा, सून, नातवंडा सोबत राहत होते. त्यांचा मुलगा अनिल कोळगे हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेला होता.

- Advertisement -

तो नेहमी वडिलांकडे त्यांच्या नावे असलेली जमीन स्वतःच्या नावे करण्याची मागणी करत असे. यामुळे दोघांमध्ये यापूर्वीही अनेक वेळा वाद झालेला होता. परंतु वडील जमीन (Land) नावावर करण्यास तयार नव्हते. याचाच राग मनात धरून आरोपीने सोमवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास वडील गणपत कोळगे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण (Beating) करून त्यांची हत्या केली.वडील मयत झाल्याचे पाहून आरोपी पसार झाला.

मयत गणपत कोळगे यांचा नातू अमोल विश्वनाथ साळवे रा. कोल्हेवाडी तालुका संगमनेर यांच्या फिर्यादीवरून राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्हा गुन्हा नंबर 300/241 भादवि कलम 302 प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सोपानराव काकड करत आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

रेल्वे प्रशासनाने उगांव स्टेशनवर पॅसेंजरला थांब्याबाबत दोन महिन्यात सकारात्मक निर्णय घ्यावा

0
उगाव | वार्ताहरउगांव रेल्वे स्टेशनवर पँसेंजरला थांबा मिळत नसल्याने शिवडीच्या सरपंच संगिता सांगळे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर सुनवाणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे...