Tuesday, December 3, 2024
Homeक्राईमCrime News : चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर मारला डल्ला; टीव्ही, पेनड्राईव्ह चोरीला

Crime News : चोरट्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेवर मारला डल्ला; टीव्ही, पेनड्राईव्ह चोरीला

संगमनेर। प्रतिनिधी

ऐन दिवाळीच्या धामधुमीत निमगाव जाळी (ता. संगमनेर) येथील जिल्हा परिषद शाळा आणि तळोले वस्तीवरील अंगणवाडीत भुरट्या चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत संगीता शेलार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की २६ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान जिल्हा परिषद शाळा आणि तळोले वस्तीवरील अंगणवाडीतून ११ हजार रुपये किंमतीचा ३२ इंच स्मार्ट टीव्ही, अभ्यासक्रम असलेला पेनड्राईव्ह, सातशे रुपये किंमतीच्या प्रत्येकी १ किलोच्या ७ तेलपिशव्या, दोनशे रुपये किंमतीची २ किलो मसूरदाळ असा एकूण ११ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. यावरून आश्‍वी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल आर. डी. पारधी करत आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या