Thursday, May 2, 2024
Homeनगरविवाहितेचा छळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

विवाहितेचा छळ; 5 जणांवर गुन्हा दाखल

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

घर बांधण्यासाठी एक लाख रुपये आणावेत यासाठी सासरी छळ करून मारहाण केल्याची फिर्याद

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील शहापूर येथील माहेर असलेल्या विवाहितेने नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून पाथर्डी तालुक्यातील सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अश्विनी अमोल कोरडे (वय 21) रा. शंकरवाडी, ता. पाथर्डी, हल्ली रा. शहापूर ता. नेवासा हिने नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, 28 जून 2018 ते 16 ऑक्टोबर 2020 रोजी पावेतो सासरी नांदत असताना मला माझे पती अमोल गव्हणनाथ कोरडे, सासरे गव्हणनाथ किसन कोरडे, सासू मुक्ताबाई गव्हणनाथ कोरडे तिघे रा. शंकरवाडी ता. पाथर्डी, नणंद कविता अनिल करांडे व नंदई अनिल करांडे दोघे रा. देहरे ता. नगर यांनी मला वेळोवेळी शारीरिक मानसिक त्रास देऊन घर बांधण्यासाठी एक लाख रुपये आणावेत या कारणाकरिता तसेच घरगुती किरकोळ कारणावरून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत उपाशीपोटी घराबाहेर काढून दिले. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा रजिस्टर फर्स्ट 856/2020 भारतीय दंड विधान कलम 498(अ), 323, 804, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या