Thursday, March 13, 2025
Homeक्राईमतरूणावर कोयत्याने हल्ला करत खुनाचा प्रयत्न

तरूणावर कोयत्याने हल्ला करत खुनाचा प्रयत्न

खांडके शिवारातील घटना || सात जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गेला म्हणून तरुणावर कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व दगडाने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करण्यात आला. तसेच दोन महिलांना देखील मारहाण करण्यात आल्याची घटना खांडके (ता. नगर) शिवारातील भगवान ठोंबे यांच्या घरी शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. किरण यमाजी चेमटे (वय 30 रा. खांडके) व चंद्रभागा अर्जुन ठोंबे (पत्ता नाही) हे दोघे जखमी झाले आहेत. जखमी किरण यांनी शनिवारी दुपारी दिलेल्या फिर्यादीवरून सात जणांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

अनिकेत राजेंद्र ठोंबे, निखिल सुभाष ठोंबे, राजेंद्र महादेव ठोंबे, साहील सुभाष ठोंबे, गणेश सुभाष ठोंबे, गौतम रामदास ठोंबे (सर्व रा. खांडके) व एक पुणे येथील अनोळखी व्यक्ती यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपी यांनी शुक्रवारी रात्री चंद्रभागा ठोंबे यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केले. घरात घुसून चंद्रभागा यांना मारहाण केली. कविता ठोंबे यांना देखील मारहाण केली. त्यांनी मदतीसाठी किरण चेमटे यांना बोलावून घेतले. किरण तेथे येताच संशयित आरोपी त्यांना म्हणाले, ‘तु सुध्दा मागील वेळेस सप्ताह चालू असताना आमच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तु जर आता भांडण सोडविण्यासाठी आला तर तुला सुध्दा खतम करून टाकू’ अशी धमकी दिली.

अनिकेत ठोंबे म्हणाला, ‘तु सुध्दा काल माझ्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भगवान ठोंबे सोबत पोलीस स्टेशनला गेला होता थांब तुला सुध्दा जिवंत ठेवत नाही, खल्लासच करून टाकतो’, असे म्हणून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयता, रॉड, दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांगर्डे करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...