Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजCrime : सख्ख्या भावाने केली लहान भावाची हत्या

Crime : सख्ख्या भावाने केली लहान भावाची हत्या

नाशिक। प्रतिनिधी Nashik

सातपूर औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या संतोषीमाता नगरातील घरात सख्ख्या माेठ्या भावाने लहानग्या भावाची धारदार हत्याराने वार करुन निर्घृण हत्या केल्याची घटना बुधवारी(दि. ११) दुपारी उघडकीस आली आहे. करण तुकाराम शिंगाडे(वय २२) असे मृताचे नाव आहे.

- Advertisement -

सातपूर पाेलिसांनी याप्रकरणी मृताचा माेठा भाऊ अर्जुन सागर तुकाराम शिंगाडे(वय २५) याला ताब्यात घेतले आहे. मद्यपान, चाेरी, घरफाेडी व हाणामारीसंदर्भाने दाेघांवर गंभीर गुन्हे नाेंद असल्याची माहिती पाेलिसांनी दिली आहे. घटना कळताच, सातपूरचे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे, गुन्हे विभागाचे पाेलीस निरीक्षक विश्वास पाटील व पथक दाखल झाले. पथकाने पंचनामा करुन मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

YouTube video player

याबाबत मृताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत करण हा तडीपार हाेता. दरम्यान, दाेघे भाऊ चाेरी, हाणामारी करुन जीवन कंठत हाेते. बुधवारी सकाळी घरात असताना त्यांच्यात किरकाेळ वादातून भांडण झाले. या भांडणात अर्जुन याने लहान भाऊ करण याच्या शरीरावर वार केले. रक्ताच्या थाराेळ्यात पडून ताे मरण पावला, असे पाेलिसांनी सांगितले. मृतांचे आई वडील माेलमजुरी करतात.

ताज्या बातम्या

Accident News : दुचाकी अपघातात आरोग्य सेवकाचा मृत्यू

0
पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner रांजणगाव रोड (Ranjangaon Road) उपकेंद्र येथे आरोग्य सेवक (Health Worker) म्हणून कार्यरत असलेले राम गुणवंतराव जाधव (वय 29) यांचा मंगळवारी (दि.6)...