Sunday, May 19, 2024
Homeजळगावमुस्लीम समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी

मुस्लीम समाजाच्या दोन गटात तुफान हाणामारी

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

मुस्लीम समाजात नुकतेच घडलेले समाज अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वादातून तसेच दुसऱ्या गटाकडून गायींची कत्तल करण्याबाबत (police) पोलीसांना माहिती पुरविल्याचे कारण करीत दोन गटात काल तलवार, रॉड, लाठ्या-काठ्यांचा वापर करीत (crime) हाणामारी झाल्याबाबत शहर पोलीसात दोन्ही गटांच्या विरोधात परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. यामुळे (chalisgaon) चाळीसगाव एकच खळबळ उडाले असून हुडको परिसरात काहीकाळ वातावरण तंग झाले होते.

- Advertisement -

शहरातील शेख गफूर शेख हजरतनूर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुस्लीम समाजातील अध्यक्ष उपाध्यक्ष निवड व फिर्यादीचा पुतण्या शहनाज रसूल यास झालेल्या मारहाणक्षच्या कारणावरुन फकीराबेग जमालबेग मिर्झा, साहील फकीराबेग मिर्झा, शकील शेख शफी अफरोजमिर्झा, अजीज मिर्झा, रियाज शेख चिराग उर्फ प्रिन्स, मोन्टी शेख अल्लाउद्दीन सर्व रा. चाळीसगाव आणि मनमाड येथील फकीराबेग मिर्झा यांचा भाचा नईम व अन्य तीन चार अनोळखी इसमांनी तलवार, चॉपर, लोखंडी रॉड अशा हत्त्यारांनी मारहाण केल्याने या घटनेत शेख रसूल शेख हजरत, शेख इम्रान शेख शब्बीर, शेख बिसमिल्ला शेख हसरत अशांना जखमी केल्या प्रकरणी शहर पोलीसांत कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ३०७, ३२४, ३२६, ३३६, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

दुसर्‍या घटनेत कमाल बेग जमालबेग मिर्झा यांच्या तक्रारीवरुन कत्तलखान्यात गायींची कत्तल करतो अशी गोपणीय माहिती पोलीसांना पुरविली या संशयावरुन गफूर शेख हजरतनूर, सिकंदर शेख गफूर, बिसमिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान, इम्रान शेख उर्फ शब्बा पहेलवान, सलमान शेख उर्फ शब्बा पहेलवान, शब्बीर शेख हजरतनूर अशांनी लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉडने फिर्यादी व फिर्यादीचे भाऊ व पुतण्यांना मारहाण केल्या प्रकरणी वरील सर्वांच्या विरोधात कलम १४३, १४४, १४७, १४८, १४९, ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या