Wednesday, March 26, 2025
Homeक्राईमNashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली 'इतक्या' लाखांची...

Nashik Crime News : बिल्डरपुत्रास जीवे मारण्याची धमकी; सराईताने मागितली ‘इतक्या’ लाखांची खंडणी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भूखंड (Plot) विक्रीचा तगादा लावणाऱ्या सराईत गुन्हेगाराने (Criminal) बिल्डरकडे वीस लाख रुपयांची खंडणी (Extortion) मागितल्याचा प्रकार वसंत मार्केटमध्ये घडला आहे. तसेच पंधरा दिवसांत पैसे न दिल्यास मुलास मारुन टाकण्याचीही धमकी सराईताने दिली. याप्रकरणी बिल्डरच्या फिर्यादीवरुन दोन संशयितांविरुद्ध सरकारवाडा पोलिसांनी (Sarkarwada Police) गुन्हा नोंदवला आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik News : ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजरांच्या अडचणीत वाढ; पोलिसांनी काढली थेट तडीपारीची नोटीस

याबाबत अधिक माहिती अशी की, कॅनडा कॉर्नर येथील वसंत मार्केटमध्ये कार्यालय असलेले बांधकाम व्यावसायिक समीर श्यामराव केदार (वय ४८) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित सूर्यभान गयाजी जाधव आणि ओम सूर्यभान जाधव (रा. गंगापूरगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा (Case) नोंद आहे.

हे देखील वाचा : Nashik News : माजी आयपीएस सासऱ्याला सुनेची धमकी; मागितली वीस लाखांची खंडणी

दरम्यान, २३ एप्रिल रोजी दुपारी दोन्ही संशयित केदार यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी बेकायदेशिररित्या वीस लाख रुपयांची मागणी केली. यासह रक्कम पंधरा दिवसांत न दिल्यास केदार यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threats) फिर्यादीच्या वडिलांना दिली. याप्रकरणी केदार यांनी सरकारवाडा पोलिसांत धाव घेतली आहे. तर दोन्ही संशयित पसार असून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Nashik Loksabha 2024 : हेमंत गोडसेंनी घेतली मंत्री भुजबळांची भेट; ‘या’ विषयावर झाली चर्चा

काय आहे प्रकरण?

संशयित जाधव हा एक जमीन खरेदी करणार होता. मात्र, त्याचा व्यवहार पूर्ण न झाल्याने केदार यांनी संबंधित जमीन खरेदी केली. त्यामुळे केदार यांच्याकडे जाधव यांनी दुसऱ्या एका जमिनीचा प्रस्ताव ठेवला. जाधव यांची जमीन खरेदी करण्यासाठी केदार यांनी पूर्वी संमती दर्शवली. त्यासाठी धनादेशही देण्यात आले. मात्र, जाधवच्या कारनाम्यांची माहिती मिळाल्यावर केदार यांनी धनादेश ‘स्टॉप’ केले. त्यामुळे जाधव यांना पैसे मिळालेच नाहीत. दरम्यान, इतर गुन्ह्यांत संशयित जाधव हा पाच वर्षांपासून कारागृहात होता. दोनवेळेस जामीनावर तो बाहेर आला. आता कारागृहातून बाहेर आल्यावर केदार यांचे कार्यालय गाठून त्याने पैश्यांची मागणी करीत धमकी दिली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Santosh Deshumukh Case: “आडवे आले तर कायमचा धडा शिकवा”; संतोष देशमुख...

0
बीड | Beedसंतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम या सुनावणीला उपस्थित राहिले. उज्वल निकम हे...