Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याअवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरासह जिल्ह्याच्या काही भागात आज अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. मागील दोन दिवसांत अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. तसेच, सर्वत्र धुक्यांसह ढगाळ वातावरण आहे. या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे.द्राक्ष,भाजीपाला उत्पादक शेतकरी अधिकच अडचणीत आले आहेत.

- Advertisement -

याशिवाय आंब्याचा मोहरही झडल्याचे दिसत आहे.दुपारी आलेल्या पडलेल्या जोरदार पावसामुळे नाशिक शहर परिसरात व्यावसायिकांनी मोठी धावपळ उडाली. दोन -अडीच तासांत 5.7 मि. मी. इतक्या पावसांची नोंद झाली.

राज्यात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणिय वाढ होऊन थंडी गायब झाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून काही भागात तुरकळ ठिकाणी पाऊस पडत आहे. गेल्या दोन दिवसांपासुन आलेल्या ढगाळ वातावरणांत काल (दि.7) किमान तापमानात वाढ झाल्यानंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊसाने जोरदार हजेरी लावत दाणादाण उडवून दिली. याचा मोठा फटका जिल्ह्यात काही भागातील द्राक्ष बागांना बसला.

उत्तर भारतात बर्फवृष्टी सुरु असुन जनजीवन विस्कळीत झाले आहे. याभागातून येणार्‍या शितलहरीमुळे दिल्ली व शेजारील भागात थंडीनंतर आता अवकाळी पाऊस सुरू झाला आहे. दीड आठवडाभरात किमान तापमानात वाढ होऊन महाराष्ट्रातून थंडी गायब झाली आहे. राज्यात सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात 10 ते 12 अंशापर्यत वाढ झाली आहे.

या बदलामुळे काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले. येत्या 9 जानेवारीपर्यत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात मेघगर्जनेसह अवकाळी पावसांची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. यानुसार दोन दिवसापासुन रिमझिम पावसाच्या सरी पडल्या होत्या. यानंतर आज मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. यात नाशिक जिल्ह्यात आज दुपारनंतर जोरदार अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची मोठी दाणादाण उडवून दिली. विशेषत: शेतकर्‍यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. यात द्राक्ष बागांना मोठा फटका बसणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.

नाशिक शहर परिसरात दुपारी दीड -दोन वाजेनंतर सुरु झालेल्या रिमझीम पाऊसाने नंतर तीन वाजेनंतर मोठा जोर धरल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडवून दिली. काही भागात पावसाचा वेग जास्त असल्याने जागोजागी रस्त्यावर तळे साचल्याचे दिसले. या यामुळे शहरातील बाजारपेठेत व्यावसायिकांची मोठी हाल झाले. तर बाजारपेठेतील गर्दी काही मिनीटीत ओसरली.

तसेच महामार्गावरील सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात साठले गेले. तसेच या पावसामुळे मुंबई आग्रा महामार्गावर वाहतुक कोंडी झाल्याचे बघायला मिळाले. शहरातील आडगांव, पंचवटी, नाशिकरोड, सातपूर, नवीन नाशिक भागात मोठा पाऊस झाल्याने नागरिकांना पावसाळ्याची अनुभूती आली. शहरात अडीच तीन तासांत 5.7 मि. मी. इतक्या पाऊसांची नोंद झाली.

पेठ तालुक्यात गुरुवारी (दि.7 ) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळी पावसामुळे कोपुर्ली खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले. पेठ तालुक्यासह कोहोर, करंजाळी, जोगमोडी परिसरात जवळपास अर्धा तास पावसाच्या तुरळक सरी बरसल्या.

आजही पावसाची शक्यता

हवामान खात्याने आज (दि.8) पासुन थेट 10 जानेवारीपर्यत मध्य महाराष्ट्रात पावसांची शक्यता वर्तविली आहे. यात उत्तर महाराष्ट्रात उद्या (दि.8) रोजी दिंडोरी व निफाड तालुक्यात जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यानंतर मात्र अवकाळीची तीव्रता कमी होणार असून 12 तारखेनंतर वातावरण बदलण्याची शक्यता आहे.

द्राक्षमणी तडकणार; भुरीचा प्रादुर्भाव

आज झालेल्या पावसामुळे काही द्राक्षबागांमध्ये पाणी साठले. या जोरदार पावसाचा मोठा फटका तयार द्राक्षांना बसणार आहे. पाऊस घडांवर पडल्यामुळे आता मणी तडकण्याची शक्यता आहे. तसेच पाणी घडात काही काळ साठणार असल्याने भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तसेच द्राक्षघडांना लावण्यात आलेले पेपर पावसाने गळून पडले असल्याने याचा परिणाम गुणवत्तेवर होणार आहे. एकुणच शहर परिसरातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांना मोठा फटका बसणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या