Tuesday, July 2, 2024
Homeक्राईमNashik Crime News : सायबर भामट्यांनी डॉक्टरला घातला तब्बल 'इतक्या' लाखांना गंडा

Nashik Crime News : सायबर भामट्यांनी डॉक्टरला घातला तब्बल ‘इतक्या’ लाखांना गंडा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

टेलिग्रामवरून ऑनलाईन टास्क (Online Tasks) देत अनेकांच्या आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या फसवणूक (Fraud) झालेल्या आहेत, त्यात आता आणखी एका डॉक्टरची भर पडली आहे. सायबर भामट्यांनी या डॉक्टरला ऑनलाईन टास्कसाठी आर्थिक आमिष दाखवून तब्बल दोन लाखांना गंडा घातला आहे.

हे देखील वाचा : Nashik Bribe News : प्रभारी सहाय्यक आयुक्त जाळ्यात

याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश पांडुरंग गायधनी (रा. गायधनी निवास, टिळक पथ, नाशिक ) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना ५ जून रोजी त्यांच्या मोबाईलवर टेलिग्राम ॲपवरून संशयित अनिका शर्मा हिने फोन करून ऑनलाईन टेलिग्रामवरून टास्क पूर्ण केल्यास चांगल्या पैशांची (Money) कमाई करता येईल असे आमिष दाखविले. तर, सायबर भामटे संशयित अमित जिदांल व कस्टमर सर्व्हिस देणाऱ्या संशयितांनी डॉ. गायधनी यांना वारंवार फोन करून त्यांचा विश्वास संपादन केला.

हे देखील वाचा : Nashik Rain News : नाशकात पावसाची हजेरी; नागरिकांची तारांबळ

तसेच, त्यांना टास्क दिले. डॉ. गायधनी यांना पैशांचा परतावा दिला नाही. या टास्कचा परतावा मिळविण्यासाठी भामट्यांनी डॉ. गायधनी यांना या-ना त्या कारणावरून यूपीआय आयडीवरुन पैसे भरण्यास सांगून तब्बल १ लाख ८१ हजार ९५० रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात (Sarkarwada Police) आयटी ॲक्टअन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या