Friday, May 3, 2024
Homeनाशिकगंगापूर धरणालगत उभारणार सायकल ट्रॅक

गंगापूर धरणालगत उभारणार सायकल ट्रॅक

नाशिक । Nashik

नाशिकच्या सायकल चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी लवकरच तसेच सायकल प्रेमींना सायकलींचा आनंद घेण्यासाठी लवकरच गंगापूर धरणा लगत सायकल ट्रक उभारला जाणार आहे. याकरीता प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

- Advertisement -

नाशिक शहरात सायकल चळवळ मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते. त्यामुळे या चळवळीला तसेच नाशिकच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला जलसंपदा विभागाच्या ताब्यातील जागेत सायकल ट्रॅक प्रस्तावित करावा असा प्रस्ताव जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिला होता. भुजबळ यांनी हा प्रस्ताव पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे पाठवला होता.

ठाकरे यांनी तातडीने या प्रस्तावाची दखल घेत यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पर्यटन विभागाला दिले आहेत. तर यापूर्वीच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून गंगापूर धरणाच्या बॅक वॉटरला बोट क्लब आणि पर्यटन केंद्र विकसित करण्यात आले आहे.

इंग्लंड, फ्रान्स, स्वित्झर्लंडच्या धर्तीवर साकारणार ट्रॅक

धरण बांधतांना ब्रिटीशांनी गंगापूर धरणाच्या पाण्यालगत जादा पूर क्षेत्रासाठी अतिरिक्त जागा भूसंपादन करून ठेवलेली आहे. त्यामुळे पर्यटन विभागामार्फत या ठिकाणी धरणाच्या पाण्यालगत ९ मीटर रूंदीचा सायकल ट्रॅक विकसित करणे शक्य आहे. अशा पध्दतीने इंग्लंड, फ्रान्स, इटली, स्वित्झर्लंड या देशात सायकल ट्रॅक विकसित करण्यात आले आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या