Tuesday, March 25, 2025
Homeजळगावअवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सायकलस्वार ठार

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत सायकलस्वार ठार

धरणगाव – प्रतिनिधी
वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्या डंपरने धडक दिल्याने सायकलस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला. जळगाव रोडवर असलेल्या महावीर जिनिंगच्या समोरच हा भीषण अपघात झाला. बांभोरी ते धरणगाव दरम्यान या चालकाने बेदरकारपणे डंपर चालवून अनेक वाहनांना कट मारले. हे सर्व भयभीत वाहनचालकांना पुढे आल्यावर हा अपघात दिसला.

धरणगाव येथील रहिवासी दत्तात्रय शंकर पाटील (वय-65) हे जिनिंग मध्ये रात्रपाळी वाचमन म्हणून काम करतात. आज गुरूवारी रात्री 7.30 वाजता ते धरणगाव कडून जिनिंग मध्ये कामासाठी सायकल वरून जात होते. याच वेळी जळगाव कडून वाळूने भरलेला डंपर (MH04/FJ8083) भरधाव वेगाने आला आणि सायकलस्वारला धडक दिली. अपघात एवढा भिषण होता की सायकल आणि सायकलस्वाराला 500 मीटर पर्यंत फरफटत नेले.

- Advertisement -

या अपघातात सायकलस्वार दत्तात्रय पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मागून येणारे माजी उपनगराध्यक्ष दिपक वाघमारे, प्रतिक जैन, स्वप्नील भोलाणे यांनी मृत दत्तात्रय पाटील यांना ओळखले आणि तात्काळ पोलिसांना माहिती दिली. शिवसैनिक देवा पाटील यांनी जखमी दत्तात्रय पाटील यांना आपल्या वाहनातून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचा जागेवरच मृत्यू झाला होता.

मृत दत्तात्रय पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुन असा परिवार आहे. समाजीक कार्यरत नेहमीच अग्रेसर राहणाऱ्या दत्तात्रय पाटील यांच्या अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच ग्रामीण रुग्णालय परिसरात प्रचंड मोठा जमाव जमला. डंपर वाळूने भरलेला असून चालक फरार आहे. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी दिली. मृत दत्तात्रय पाटील हे एसटी चालक समाधान पाटील यांचे वडील होत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...