Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रराज्य सरकारने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी - नाना पटोले

राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना भरीव मदत करावी – नाना पटोले

मुंबई – राज्य सरकारने गरज वाटल्यास कर्ज घ्यावे पण तौत्के चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांना भरीव मदत करावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले रत्नागिरी दौर्‍यावर असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहेत.

मिरकरवाडा बंदरातील नुकसानीची पाहणी केली यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत केली नाही केली तरी राज्य सरकारने कोकणातील जनतेला मदत करावी अशी भूमिका काँग्रेसची असल्याचेही ते म्हणाले.

- Advertisement -

तौत्के चक्रीवादळामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कोकणातील लोकांना भरीव मदत करुन पुन्हा उभ केले पाहिजे. वेळ आली तर कर्ज घ्या केंद्राने मदत केली नाही तरी महाराष्ट्र सरकारने कोकणावासियांना पुर्ण मदत, भरीव मदत करणे गरजेचे आहे.

केंद्र सरकारकडे भीक नाही मागत आहे तो आमचा हक्क आहे. राज्य सरकारला गरज पडल्यास कर्ज घ्या पण या आपत्तीमध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना भरीव मदत करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाना पटोलेंनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या