Friday, May 3, 2024
Homeनगरदाढ खुर्द येथे लम्पी जनावरांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करणार - येरेकर

दाढ खुर्द येथे लम्पी जनावरांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करणार – येरेकर

दाढ |वार्ताहर| Dadh

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द येथे लम्पी जनावरांकरीता विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येणार असल्याचे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी सांगितले.

- Advertisement -

दाढ खुर्द येथे शेतकर्‍यांच्या विविध गोठ्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी सदिच्छा भेट देत गोठ्यांची माहिती घेतली व आजारी जनावरांविषयी शेतकर्‍यांनी कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

यावेळी संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे, विस्ताराधिकारी श्री. ठाकूर, डोके, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बी. आर. शिंदे, ग्रामसेवक भारत सोनवणे, सरपंच सतीश कुंडलिक जोशी, माजी पोलीस पाटील नारायणराव कहार, डॉ. साईनाथ जोशी, डॉ. राजेंद्र साळवे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब शंकर जमदाडे, रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्राचे सरचिटणीस किशोर वाघमारे, भागवत महाराज जोरी, रमेश रबाजी जोशी आदी उपस्थित होते.

शेतकर्‍यांनी जनावरांची काळजी घ्यावी, स्वच्छता ठेवावी व गोठ्यात डास होणार नाही याची काळजी घ्यावी तसेच जे जनावर आजारी आहे त्यांना इतर जनावरांपासून लांब ठेवावे व त्या गाईचे दूध पिवू नये असे श्री. येरेकर यांनी केले.

यावेळी दाढ खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सतीश जोशी, ग्रामसेवक भारत सोनवणे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह गटविकास अधिकारी व इतर टीमचे दाढ खुर्द गावाला भेट दिल्यामुळे आभार मानून सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या