Friday, June 19, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : २० ऑक्टोबर २०२५ - फट फटाका फुटला!

संपादकीय : २० ऑक्टोबर २०२५ – फट फटाका फुटला!

दिवाळीतील फटायांनी प्रत्येकाचे बालपण व्यापले आहे. ते वाजवण्याचे संदर्भ काळानुसार बदलत गेले तरी दिवाळी आणि फटायांचे नाते अतूटच राहिले आहे. बंदुकांमधून टिकल्या फुटायचा आवाज म्हणजे दिवाळीची नांदीच असते. फट फटका फुटला..धम धमाका झाला..लावा पणती..उजळू दे भिंती..ही बालपणीची कविता आजही पाठ असेल. तथापि अलीकडच्या काळात या कवितेतील फटायांचा धमाका वारंवार चर्चेत येतो. वादविवादाचा मुद्दा बनतो. यंदाही तसे घडत आहे. राज्यांच्या, जिल्ह्यांच्या स्थानिक परिस्थितीनुसार फटाक्यांच्या आवाजावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

उदाहरणार्थ, दिवाळीच्या दिवसात १२५ डेसिबल आवाजाच्या फटायांवर नाशिक जिल्हाधिकार्‍यांनी बंदी घातली आहे. दिल्ली परिसरात फक्त हरित फटाके विक्री आणि वाजवायला सर्वोच्च न्यायालायने परवानगी दिली आहे. दिल्ली परिसरात फटाके वाजवण्याच्या वेळा देखील ठरवून दिल्या आहेत. हरित फटाके हे सामान्य फटायांपेक्षा कमी हानिकारक मानले जातात. सर्व प्रकारच्या प्रदूषणाची वाढती पातळी या बंदीच्या मुळाशी आहे. प्रदूषण कोणत्याही प्रकारचे असले तरी ते सृष्टी आणि मानवी आरोग्यासाठी सारखेच हानिकारक असते. प्रदूषणाला एकच रंग असतो, काळा. ही जाणीव रुजण्याची गरज आहे. कोणतीही गोष्ट अती केली की, त्याची मातीच होते हे पूर्वसुरींनी सांगून ठेवले आहे. कोणत्याही बाबतीत ते विसरून कसे चालेल? फटाकेमुक्त दिवाळीचा आग्रह धरला जात आला तरी ते शय होऊ शकेल का यविषयी आग्रह धरणारे सुद्धा साशंक असतील आणि मुळात बंदी हा समस्येवरचा उपाय नाही किंवा बंदीमुळे समस्या मुळापासून संपुष्टात येत नाही हे अनेकदा अनुभवास येते.

बहुसंख्य बंदी लोक धुडकावून लावतात. एकदा वापरून फेकून दिल्या जाणार्‍या प्लास्टिक वापरावरील बंदी हे त्याचे चपखल उदहारण ठरावे. बंदी या प्रकारच्या प्लास्टिकचा वापर थांबवू शकलेली नाही. लोकांची जाणीव जागरूक झाली की समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. तिची तीव्रता आणि त्यामुळे होणारी कायमची हानी लक्षात येते. तसे झाले की सवयी आपोआप बदलतात. ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्याला पर्याय नाही. त्याच्या पाऊलवाटेकडे सर्वोच्च न्यायाललयाने ने अंगुलीनिर्देश केला आहे. संतुलित दृष्टिकोन स्वीकारावा लागेल असे म्हंटले आहे. त्या वाटेवरचा प्रवास पंढरपुर तालुयातील चिंचणी गावाने सुरु केला आहे. गेली दहा वर्षे त्या गावातील लोक दिवाळीला फटाके वाजवत नाहीत. त्या गावाने हा सामूहिक निर्णय घेतला आहे. त्याची गोष्ट माध्यमात प्रसिद्ध झाली आहे. तीव्र आवाजाच्या, विषारी धूर निर्माण करणारे फटाके वाजवले तर हवा आणि ध्वनी प्रदूषण किती वाढते आणि ते किती प्रकारची हानी करते हे लोकांना सातत्याने पटवून द्यावे लागेल.

डेसिबल हे आवाजाची तीव्रता मोजण्याचे प्रमाण आहे. माणसाचे कान साधारणपणे ७० डेसिबल पर्यंतचा आवाज ऐकू शकतात.त्यापेक्षा वरचा कोणताही जास्त आवाज मानवी कान जायबंदी करू शकेल. कृत्रिम कान तयार करण्यात मानवाला अजूनही यश आलेले नाही. म्हणजे बहिरेपण कायमचे वाट्याला येऊ शकते. श्वसनसंस्थेशी संबंधीत दीर्घकालीन व्याधी जडू शकण्याचे हवा प्रदूषण हे एक प्रमुख कारण मानले जाते आणि फटाके हे दोन्ही प्रकारच्या प्रदूषणाची पातळी वाढवते यात दुमत नसावे. त्यावरच्या मर्यादा सामाजिक पातळीवर स्वीकारार्ह आढळत नाहीत. किंबहुना त्याची विपरीत प्रतिक्रिया उमटते. अस्मिता देखील जोडली जाताना आढळते. ज्यामुळे समाजमन भरकटण्याचा धोका असतो. कोणतीही गोष्ट अती करण्याला माणसांनी स्वतःहूनच मर्यादा पाळल्या तर बंदी घालायचा प्रश्नच उरणार नाही.

फटाके आणि आवाजी स्वरूप धारण करण्याला अटकाव करण्याची वेळच यंत्रणेवर येणार नाही. न्यायालयाने घालून दिलेल्या वेळेच्या आणि आवाजाच्या मर्यादेत फटाके वाजवण्यातच खरा आनंद मानण्याची आवश्यतकता आहे. सामाजिक शहाणपण-सामाजिक भान रुजण्याची सुरुवात या दिवाळीपासून होऊ शकेल. ज्येष्ठ राजकीय नेते अटलबिहारी वाजपेयी एका कवितेत म्हणतात, हम पडाव को समझे मंजिल, लक्ष्य हुवा आँखो से ओझल, वर्तमान की मोह जाल मैं, आनेवाला कल न भुलाये, आओ फिर से दिया जलाये..’तेव्हा सगळे एकत्र येऊ यात आणि या दिवाळीपासून सामाजिक शहाणपणाचा दिवा लावण्याचा प्रयत्न करूयात..

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...